शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपा 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 11:27 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

ठळक मुद्देयोगींनी या मुलाखतीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवरही सडकून टीका केली.बदलत्या ऋतुमानासारखे राहुल गांधी मोसमी राजकरणी असल्याची टीका त्यांनी केली.

नवी दिल्ली -  गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. गुजरातमध्येही पूर्ण बहुमताने भाजपाचे सरकार सत्तेवर येईल. गुजरातमध्ये  भाजपा 150 जागा जिंकेल  असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी 150 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही त्यापेक्षाही जास्त जागा जिंकू असे आदित्यनाथ म्हणाले. 

गुजरातमधला विकासाच सर्वकाही सांगून जातो असे योगी म्हणाले. योगींनी या मुलाखतीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवरही सडकून टीका केली. राहुल गांधी फक्त निवडणुकीच्यावेळी सक्रीय असतात. बदलत्या ऋतुमानासारखे राहुल गांधी मोसमी राजकरणी असल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधी निवडणुकीच्यावेळी दिसतात. त्यानंतर ते गायब होतात. त्यांचे विकासामध्ये काहीही योगदान नाही असे योगी म्हणाले. 

उत्तर प्रदेशातील विकासाच्या मुद्यावरुनही त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. अमेठीच्या विकासासाठीही राहुल गांधींनी काहीही केलेले नाही असे ते म्हणाले. अमेठी हा गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ आहे. गुजरातमधले तरुण नेते भाजपाच्या विरोधात आहेत या प्रश्नावर त्यांनी गुजरातमधल्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या दूरदृष्टीवर विश्वास आहे असे उत्तर त्यांनी दिले. 

मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करतेयदु:ख, वेदना नसलेल्या राम राज्याची संकल्पना अयोध्येने दिली. सध्याच्या घडीला सर्वांना घर, वीज आणि प्रत्येक घरामध्ये एलपीजी सिलिंडर मिळाला तर ते ख-या अर्थाने राम राज्य असेल असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. योगींनी यंदाची दिवाळी अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर साजरी केली. केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार राम राज्य निर्माण करण्याच्या दिशेने काम करत असून, मोदी सरकारच्या कामामुळे सर्वसामान्य जनतेला जे सुख मिळेल तेच राम राज्य असेल असे योगी म्हणाले. प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असले पाहिजे. 2019 पर्यंत प्रत्येक घरामध्ये शौचालय तसेच वीज मिळाली पाहिजे. पंतप्रधानांचे ते स्वप्न आहे. हेच खरे राम राज्य आहे असे योगी म्हणाले. 

टॅग्स :Gujaratगुजरातyogi adityanathयोगी आदित्यनाथ