शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवलेल्या सुशीलकुमार मोदींबाबत भाजपाने घेतला मोठा निर्णय

By बाळकृष्ण परब | Updated: November 27, 2020 20:55 IST

Sushilkumar Modi News : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएमधील मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने उपमुख्यमंत्रिपदासाठी सुशीलकुमार मोदी यांच्या नावावर काट मारून धक्कादायक निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडीचे आव्हान मो़डीत काढत एनडीएने निसटता विजय मिळवला होता. दरम्यान या निवडणुकीत एनडीएमधील मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने उपमुख्यमंत्रिपदासाठी सुशीलकुमार मोदी यांच्या नावावर काट मारून धक्कादायक निर्णय घेतला होता. सुशील कुमार मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी केल्यानंतर आता भाजपाने त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.बिहारमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुशीलकुमार मोदी यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे बिहारमधील राज्यसभेची ही जागा रिक्त झाली होती. या जागेचा कार्यकाळ २०२४ पर्यंत आहे. दरम्यान, बिहार भाजपामधील ज्येष्ठ नेते असलेल्या सुशीलकुमार मोदींकडे केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपाचे नेते पण सरकारमध्ये नितीश कुमार यांचे विश्वासू सहकारी मानल्या जाणाऱ्या सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर घेतला होता. त्यांच्या जागी रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर सुशीलकुमार मोदी हे नाराज असल्याची चर्चा होती.आता राज्यसभेच्या एका जागेसाठी होत असलेली ही पोटनिवडणूक १४ डिसेंबर रोजी नियोजित आहे. या निडणुकीत सकाळी ९ ते चार या काळात मतदान होईल. त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख ३ डिसेंबर आहे.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारPoliticsराजकारण