शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे स्टार मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी कर्नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ पासून राज्यात दौरा सुरू करणार आहेत

संजय शर्मा नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले सर्व स्टार प्रचारक उतरवले आहेत. भाजपचे सर्वांत मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ एप्रिलला कर्नाटकातील बेळगाव येथून त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आधीच कर्नाटकात प्रचारात व्यस्त आहेत. मंगळवार आणि बुधवारी भाजप कर्नाटकात सर्व २२४ मतदारसंघांत स्टार प्रचारकांना प्रचारात उतरविणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ पासून राज्यात दौरा सुरू करणार आहेत. बेळगावमधील चिक्कोडी, कित्तूर, कुडाची या भागाचा ते दौरा करतील. त्यानंतर पंतप्रधान ३, ५ आणि ८ मे रोजी कर्नाटकमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून २५ एप्रिलला अमित शाह बागलकोट जिल्ह्यातील तेरादल, विजयपुरा जिल्ह्यातील देवरीपरागी आणि यादगिरी येथे निवडणूक सभा घेणार आहेत. यादगिरीमध्ये ते रोड शो करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील कर्नाटकातच प्रचारात व्यस्त आहेत.

राजनाथ सिंह, गडकरी, फडणवीस यांच्याही सभा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह २६ एप्रिल, २९ एप्रिल, ५ मे आणि ७ मे रोजी कर्नाटकात प्रचारासाठी जाणार आहेत. या चार दिवसांत राजनाथ सिंह २० निवडणूक सभा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही कर्नाटकात पोहोचल्या आहेत. २५ एप्रिल ते ८ मे दरम्यान स्मृती इराणी डझनभर निवडणूक

सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील २६ पासून कर्नाटकात आपला निवडणूक प्रचार सुरू करणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत.

अमित शाह यांच्याकडून चामुंडेश्वरीची पूजाम्हैसूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथील चामुंडी हिल्सवरील प्रसिद्ध प्राचीन मंदिराला भेट देऊन देवी चामुंडेश्वरीची पूजा केली. त्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी मंदिराला प्रदक्षिणाही घातली.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnatakकर्नाटकElectionनिवडणूक