शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा - बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 01:48 IST

राज्यात पथक पाठविल्याबद्दल केली टीका

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात पथक पाठविण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले व त्यात तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या. त्यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस समोरासमोर उभे ठाकले आहेत. 

“मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रेही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय पथक आलेही आहे. राज्यात जनतेने भाजपला स्वीकारले नाही म्हणून असे घडत आहे, ” असे बॅनर्जी म्हणाल्या. “जनादेशाचा स्वीकार करण्याचे मी भाजपला आवाहन करते. आपल्याला कोरोना संकटाला तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे,” असेही त्या म्हणाल्या. त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना धोरणावरच प्रश्न उपस्थित केला. “केंद्राकडे कोरोनासंदर्भात कोणत्याही प्रकारचे पारदर्शक धोरण नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे,” असे बॅनर्जी म्हणाल्या. 

भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करून, अजूनही राज्याला पुरेशा लसी मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल