शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सर्व माजी पंतप्रधानांचा आदर करा -मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 05:10 IST

सामाजिक न्याय  पंधरवड्यानिमित्त सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात ६ एप्रिलपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत तीन मूर्ती भवन परिसरात उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयाचे महत्त्व अधोरेखित करताना  भाजपच्या खासदारांना सांगितले की, सर्व माजी पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे.सामाजिक न्याय  पंधरवड्यानिमित्त सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात ६ एप्रिलपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी सुरू करण्यात आलेल्या योजना आणि कार्यक्रमांचा लोकांपर्यंत प्रचार करण्यासही सांगितले.१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधानांना समर्पित संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत.या बैठकीत सहभागी असलेल्या एका नेत्याच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे सर्व माजी पंतप्रधानांचा समर्पित संग्रहालयाचे महत्त्व विशद करताना म्हणाले की,  माजी पंतप्रधानांमध्ये भाजपचे  एकच पंतप्रधान आहेत. तथापि, देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याने सर्वांचा आदर-सन्मान केला पाहिजे. आम्ही माजी पंतप्रधानांचा आदर केला आहे. 

पक्षाभिनिवेश न बाळगता सर्व पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे. मोफत धान्य योजनेला आणखी सहा महिने मुदतवाढ दिल्याबद्दल भाजप संसदीय पक्षाने पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद दिले, असे केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रीय मान्यतेचे हे एकप्रकारे लोकशाहीकरण असून, आमच्या सर्व माजी पंतप्रधानांप्रति कृतज्ञतेचे अभिव्यक्ती आहे, असे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी