शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमारांचं सरकार पाडण्यासाठी लालूंची भाजपाला ऑफर - सुशील मोदी

By admin | Updated: July 3, 2017 10:49 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - ""बेहिशेबी संपत्ती प्रकरणात भाजपाने मदत केली तर बिहारमधील नितीश कुमार यांचं सरकार पाडण्यासाठी आपण भाजपाला मदत करू, अशी ऑफर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी दिली होती"", असा गौप्यस्फोट भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी केला आहे. ""इकॉनॉमिक टाइम्स""ला दिलेल्या मुलाखतीत सुशील मोदी यांनी हा दावा केला आहे. 
 
मुलाखतीदरम्यान सुशील मोदी म्हणाले की, ""पहिल्या दिवसापासून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यातील युती यशस्वी झाल्याचे दिसत नाही. त्यांचे विचारही जुळत नाहीत. गेल्या 17 महिन्यांमध्ये त्यांच्या सरकारमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या.  अंर्तगत वादांमुळे त्यांचे सरकार आतापर्यंत एकही मंडळ किंवा आयोग स्थापन करू शकले नाही.  तर 9 महिन्यांपासून राज्यातील असंख्य बदल्या रखडल्या आहेत. कारण लालूंना स्वतःच्या मर्जीनं अनेक अधिका-यांची नियुक्ती करायची आहे.  मला नितीश कुमार यांची कार्यपद्धती माहिती आहे. त्यांचे कधीही लालूंसोबत जुळून येणार नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा, सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी यांसारख्या मोठ्या निर्णयांना नितीश कुमार यांनी समर्थन दर्शवले. याद्वारे त्यांनी काँग्रेसला जो इशारा द्यायचा तो दिला"". 
दरम्यान,  कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आयकर विभागानं लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात केलेल्या कारवाईत चार मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. यातील तीन मालमत्ता लालू यांचे पुत्र तेजस्वी यांच्या आहेत. तर लालूंची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारती यांना दिल्लीतील बिजवासन येथील बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आयकर विभागाने चौकशीसाठी  6 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, मिसा भारती यांनी त्यांच्या वकिलांना पाठवले होते.  यावेळी मिसा भारती यांना गैरहजर राहिल्यानं 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.  शिवाय आयकर विभागाने 16 मे रोजी दिल्ली आणि गुरुग्राम येथील लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते.