शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपाला हवे आहेत कमकुवत सहकारी, चंद्राबाबू यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:50 IST

आंध्र प्रदेशला विशेष राज्य दर्जाच्या मागणीसाठी तेलगू देसम पार्टीचे नेते व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असून, बिगरकाँग्रेस व बिगरभाजप नेत्या-खासदारांशी त्यांनी मंगळवारी चर्चा केली. आंध्र प्रदेशला सढळ हाताने मदत केल्याचा केंद्राचा दावा खोडून काढण्यासाठी त्यांनी आंध्र भवनात नेते आणि पत्रकारांना निमंत्रित केले आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली - आंध्र प्रदेशला विशेष राज्य दर्जाच्या मागणीसाठी तेलगू देसम पार्टीचे नेते व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असून, बिगरकाँग्रेस व बिगरभाजप नेत्या-खासदारांशी त्यांनी मंगळवारी चर्चा केली. आंध्र प्रदेशला सढळ हाताने मदत केल्याचा केंद्राचा दावा खोडून काढण्यासाठी त्यांनी आंध्र भवनात नेते आणि पत्रकारांना निमंत्रित केले आहे.चंद्राबाबू नायडू म्हणाले की, अमरावतीमध्ये नव्या राजधानीच्या उभारणीसाठी एक पैसाही राज्याने खर्च केला नाही, हे केंद्राचे म्हणणे खोटे आहे. नव्या राज्याची निर्मितीनंतर केंद्राने निधी देण्याचा शब्द पाळला नाही. त्यावर मी चर्चेस तयार आहे, त्यासाठी सर्व दस्तऐवजही सादर करू. राज्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी केंद्र राजकारण खेळत असून, राज्य सरकारला अपमानित करीत आहे, असा आरोप करून चंद्राबाबू म्हणाले की, आंध्र्रला तारणाऱ्या मुख्यमंत्र्याऐवजी केंद्राला कमजोर मुख्यमंत्री हवाय. सहकारी पक्षांना भाजप सन्मान देत नाही. वायएसआर काँग्रेससारखे कमजोर पक्ष भाजपाला हवे असतात, ज्यांचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करीत आहेत. रायलसीमासारखे मुद्दे काढून भाजपा प्रादेशिक पक्षांना चिथावणी देतो.नायडू यांनी अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल व अकाली दलाचे नरेश गुजराल यांनाही भेटले द्रमुकच्या नेत्या कणिमोळी, अनुप्रिया पटेल (अपना दल) फारुक अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), जितेंद्र रेड्डी (तेलंगणा राष्ट्र समिती) यांचीही भेट झाली. ‘लोकमत मीडिया ग्रुप’चे अध्यक्ष विजय दर्डा हेही नायडू यांना भेटले. त्यांनी राज्यातील विद्यमान परिस्थिती व राज्य व केंद्र यांच्या संबंधांवर त्यांच्याशी चर्चा केली.दिवसभर भेटीगाठीनायडू आपल्या दिल्लीभेटीत विरोधी पक्षनेत्यांना भेटून आंध्र प्रदेशवर कसा अन्याय झाला हे समजावून सांगणार आहेत. नायडू आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तीन तास होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारपूर्वीच तहकूब झाल्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये खूपच गर्दी होती. तेथे नायडू नेते व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटले. नायडू यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.

टॅग्स :BJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूPoliticsराजकारण