शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी भडकले; अरविंद केजरीवालांना म्हणाले नक्षलवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:24 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली: दिल्लीचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. केजरीवाल हे छुपे नक्षलवादी असल्याची टीका त्यांनी केली. ते रविवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्विग्नपणे म्हटले की,  अरविंद केजरीवाल हे जन्मजात नक्षलवादी आहेत. इतर राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना  पाठिंबा का देत आहेत, असा सवालही स्वामींना यावेळी विचारला. केजरीवाल यांनी राज्यपालांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ममता बॅनर्जी, कुमारस्वामी, पिनराई विजयन आणि चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन हा वाद मिटवण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. तसेच केजरीवाल यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र नायब राज्यपालांनी परवानगी नाकारल्याने संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडताना देशात संवैधानिक संकट निर्माण झाल्याची टीका केली होती.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाdelhiदिल्ली