शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त भागाची पाहणी करताना भाजपाचे खासदार नदीत पडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 13:34 IST

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमाण घातले आहे.

पटना : बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजापचे पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील खासदार राम कृपाल यादव यांनी बुधवारी आपल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी धनरुआ येथील रमणी बिगहा भागात पुराची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांची बोट उलटल्यामुळे ते नदीत पडले. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी त्यांना वाचविले. या घटनेत राम कृपाल यादव जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती राम कृपाल यादव यांनी आपल्या ऑफिशल सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. 

राम कृपाल यादव यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, "पाटलीपुत्र मतदार संघातील पूरग्रस्त भागाची सकाळपासून पाहणी करत आहे. लोकांचे दु:ख जवळून पाहत आहे. मदतीसाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले जात आहेत. काही भागातील परिस्थिती खूपच वाईट आहे. लोक हैराण आहेत. लवकरच त्यांची समस्या दूर होईल. यादरम्यान, मी आज स्वत: दुर्घटनेत सापडलो. धनरुआमधील रमणी बिगहामध्ये पाण्याची खोली जास्त होती. कोणत्याही व्यवस्थित बोटीची व्यवस्था झाली नव्हती. स्थानिक लोकांनी चचरीवाल्या बोटीची व्यवस्था केली होती. या बोटीतून जाताना पाण्याची क्षमता जास्ता असल्यामुळे बोट बुडाली. यावेळी लोकांनी मला लवकर बाहेर काढले. यात किरकोळ जखम झाली आहे. मात्र, लोकांच्या आशीर्वादामुळे सुरक्षित आहे."  

दरम्यान, बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमाण घातले आहे. या पावसामुळे आलेल्या पुरात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, गया, भोजपूर, भागलपूर आदी जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून, तेथील पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवावी, असा आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रशासनाला दिला आहे. 

टॅग्स :Biharबिहारfloodपूर