शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; गोडसेच्या विधानावर प्रज्ञासिंह ठाकूरांचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 13:21 IST

महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली.

नवी दिल्लीः महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. त्यानंतर भाजपानंही संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीवरून त्यांना हटवलं. आजही संसदेत गदारोळ झाला असता, प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागितली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, माझ्या विधानानं जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागते, असंही त्या म्हणाल्या आहे. संसदेतील एका सदस्यानं मला दहशतवादी म्हटलं आहे. हा माझ्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. न्यायालयात माझ्याविरोधात अजूनही आरोप सिद्ध झालेले नाहीत.माझा कोणताही दोष नसताना मला दहशतवादी ठरवणं कायद्याच्या विरोधात आहे. तरीही मी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागते. संसदेत प्रज्ञा सिंह ठाकूरांच्या विधानानं काँग्रेसनं मोठा गोंधळ घातला आहे. महात्मा गांधींची जय अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या आहेत. तर भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी प्रज्ञासिंह ठाकूरांना ट्विटरवरून दहशतवादी म्हटल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.आमची फक्त एकच मागणी आहे, कोणत्याही अटीशिवाय प्रज्ञासिंह ठाकूरांनी माफी मागायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसनं शिवसेनेबरोबर जात केलेल्या सत्ता स्थापनेवर टीका केली आहे. काँग्रेसनं शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केलेलं आहे. शिवसेनेनंही सामनामधून नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आहे. काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत लाचार होऊ शकते, असं निशिकांत दुबे म्हणाले आहेत. तत्पूर्वी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणणाऱ्या भाजप खासदार व मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाचा धिक्कार करीत भाजपाने त्यांची संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीच्या सदस्यपदावरून गुरुवारी हकालपट्टी केली होती. भाजप संसदीय समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासही त्यांना बंदी घातली आहे. भाजपाने प्रज्ञा ठाकूर यांचे प्रकरण पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे पाठवले होते. त्यांना पक्षातून काढून टाकावे, असे भाजपाच्या अनेक नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, त्या खासदार असल्याने शिस्तभंग समितीच त्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा