शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:23 IST

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. मतदारांना आर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या ...

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. मतदारांना आर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने आश्वासनांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. यातच आज महिला आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपले 'संकल्प पत्र' प्रसिद्ध केले. यात प्रामुख्याने मध्यम आणि कनिष्ठ वर्गातील महिला तसेच २१ ते ४० वयोगटातील बेरोजगार तरुणांना दरमहा ३००० रुपयांची आर्थित मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपच्या या संकल्पपत्राकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रिय 'लक्ष्मी भंडार' योजनेला शह, म्हणून बघितले जात आहे.

भाजपने आपल्या संकल्प पत्रात महिला आणि तरुणांना केंद्र स्थानी ठेवले आहे. सत्तेत आल्यास, महिला आणि बेरोजगार तरुण मिळून दरमहा ६,००० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातील, असे भाजपने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, गर्भवती महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी २१,००० रुपयांची एकरकमी मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात या रकमेत आणखी वाढ करण्याचे संकेतही पक्षाने दिले आहेत.

ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा -तृणमूल काँग्रेसच्या 'लक्ष्मी भंडार' योजनेचा बंगालमध्ये मोठा प्रभाव आहे. २०२१ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सध्या सामान्य प्रवर्गातील महिलांना १५०० रुपये आणि एससी/एसटी प्रवर्गातील महिलांना १७०० रुपये दिले जातात. सुमारे २.४२ कोटी महिला या योजनेचा लाभ घेतात. ममता बॅनर्जी यांच्या या 'मास्टरस्ट्रोक'ला उत्तर देण्यासाठी भाजपने थेट ३००० रुपयांचे आश्वासन दिले आहे.

तरुण-तरुणींना आकर्षित करण्याचा प्लॅन -याशिवाय, तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपने बंगाल सरकारच्या 'युवा साथी' योजनेलाही ठोसा देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या योजनेत बेरोजगारांना १५०० रुपये भत्ता दिला जातो. मात्र भाजपने ही रक्कम दुप्पट करत ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. महत्वाचे म्हणजे, पुढील ५ वर्षांत १ कोटी नोकऱ्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP promises financial aid in Bengal, challenging Mamata's scheme.

Web Summary : BJP's Bengal manifesto promises ₹3000 monthly aid to women and unemployed youth, countering Mamata's 'Lakshmi Bhandar' scheme. They also pledge ₹21,000 for pregnant women and aim to create one crore jobs in five years.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जी