शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या कारवर हल्ला करणाऱ्या भाजप नेत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 18:02 IST

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्देगुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी धनेरामधून त्या स्थानिक नेत्याला अटक करण्यात आलं आहे. जयेश दर्जी असं या नेत्याचं नाव असून तो बनासकांठाचा भाजपचा जिल्हा महामंत्री आहे.

अहमदाबाद, दि. 5- गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी धनेरामधून त्या स्थानिक नेत्याला अटक करण्यात आलं आहे. जयेश दर्जी असं या नेत्याचं नाव असून तो बनासकांठाचा भाजपचा जिल्हा महामंत्री आहे. तसंच या प्रकरणी इतर तिघांना ताब्यात घेतलं आहे. दर्जी हा या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राहुल गांधींच्या कारवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली.

बनासकांठा येथे पूरग्रस्त लोकांना भेटण्यासाठी गेले असताना कारवर झालेल्या हल्ल्यावरून राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला होता. या हल्ल्यामागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.  तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी निशाणा साधला होता. ज्यांनी हल्ले घडवून आणले तेच या हल्ल्याचा निषेध कसा करतील, असा आरोप त्यांनी मोदींवर केला होता. मोदी आणि आरएसएस-भाजपची राजकारणाची हीच पद्धत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. 

नेमकं काय घडलं ?गुजरात दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर धनेरा येथील लाल चौकात हा हल्ला करण्यात आला . काँग्रेसने या हल्ल्यामागे भाजपा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला. भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसला आमच्यावर आरोर करायची सवय झाली आहे असं म्हटलं. पूरग्रस्त गुजरातच्या दौऱ्यावर असताना काही लोकांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले होते. तसंच त्यांच्या वाहनताफ्यावर दगडफेक केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कारवर दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. दगडफेक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्याचा दावा करण्यात आला होता. भाजपच्या गुंडांनी राहुल गांधींच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.

बनासकाठामध्ये राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हा सर्वांमध्ये येऊ इच्छितो, काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत आहे. मी पूरग्रस्तांच्या सोबत आहे. तत्पूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांशी बातचीत केली होती.