शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"...सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणं योग्य नाही"; Marital Rapeच्या मुद्द्यावर संसदेत स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:43 IST

"वैवाहिक जीवनात लैंगिक हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पण...."

देशात अनेक वेळा उपस्थित होणाऱ्या कथित मॅरिटल रेपच्या (Marital Rape) मुद्द्यावर सरकारने पुन्हा एकदा आपले मत स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बुधवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.

'सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणे अयोग्य' -संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरील (Union Budget 2022) चर्चे दरम्यान स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या, वैवाहिक जीवनात लैंगिक हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पण, याच्या नावाखाली सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणेही योग्य नाही. तसेच, देशातील प्रत्येक लग्नाची निंदा करणेही योग नाही, असेही स्मृती इराणी म्हणाल्या.

'गरजू महिलांना दिली जातेय मदत' -खरे तर, सीपीआय खासदार बिनॉय विश्वम (CPI MP Binoy Vishwam) यांनी बजेट सत्रादरम्यान 'वैवाहिक जीवनात लैंगिक हिंसाचार' यासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या, सध्या महिलांशी संबंधित प्रकरणांत मदत करण्यासाठी संपूर्ण देशात 30 हून अधिक हेल्पलाइन कार्यरत आहेत. या हेल्पलाइन्सच्या माध्यमाने 66 लाख हून अधिक महिलांना मदत करण्यात आली आहे.

स्मृती म्हणाल्या, देशभरात 703 'वन स्टॉप सेंटर'देखील महिलांना मदत करत आहेत. यांच्या माध्यमाने 5 लाख महिलांना मदत करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर मॅरिटल रेप (Marital Rape)चे प्रकरण सुप्रीम कोर्टात विचाराधीन आहे. यामुळे यामुद्द्यावर सरकार अधिक चर्चा करू शकत नाही, असेही स्मृती यांनी सीपीआय खासदार बिनॉय यांना सांगितले. 

'विवाह संस्थाच नष्ट होईल' -भाजप नेते सुशील मोदी यांनीही या चर्चेत भाग घेतला. जर सरकारने वैवाहिक बलात्कार गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला, तर विवाह संस्थाच नष्ट होईल, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणी