शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम'चा द्वेष; बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 31, 2021 15:39 IST

तृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, कोरोनामध्येही महापाप केलं, स्मृती इराणींचा हल्लाबोल

ठळक मुद्देतृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, स्मृती इराणींचा हल्लाबोलतृणमूल काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड फेब्रुवारी पर्यंत रिकामी होणार, शुभेंदू अधिकारी यांचा इशारा

येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच भाजप आणि पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी यांचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस यांनी आपली कंबर कसली आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. भाजपचे अनेक नेते पश्चिम बंगालचा दौरा करत आहेत. नुकताच अमित शाह यांचा नियोजित पश्चिम बंगालचा दौरा रद्द झाला. परंतु त्यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पश्चिम बंगालला पोहोचल्या. हावडामध्ये आयोजित एका रॅलीदरम्यान त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. इतकंच काय तर त्यांनी बंगाली भाषेत आपलं भाषण केलं. तसंच ममता बॅनर्जी यांना जय श्रीरामचा द्वेष असून या ठिकाणी रामराज्य स्थापन होणार असल्याचंही त्या म्हणाल्या. "यावेळी पश्चिम बंगालमध्ये रामराज्य स्थापित होणार आहे. दीदी यावेळी तृणमूल काँग्रेस सत्तेतून पायउतार होणार आहे आणि भाजप सत्तेत येणार आहे," असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांच्या रॅलीदरम्यान बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि बंगाल भाजप प्रमुख दिलीप घोष हेदेखील उपस्थित होते. "पहिल्यांदा कोणत्या नेत्यानं कट मनी स्वीकारलं. हे सरकार तांदूळ आणि डाळ चोर आहे. दीदींनी कोरोना महासाथीतही महापाप केलं आहे," असंही त्या म्हणाल्या. "जो पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठई केंद्र सरकारचा द्वेष करतो, जो आपल्याच लोकांना दूर करतो, जो जय श्रीरामच्या घोषणेचा अवमान करतो त्या पक्षाला कोणीही राष्ट्रभक्त ठरवू शकत नाही," असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी शुभेंदू अधिकारी यांनीदेखील तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. "तृणमूल काँग्रेस ही आता लिमिटे़ड कंपनी झाली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत टीएमसी प्रायव्हेट लिमिटेड पूर्णपणे रिकामी होईल. त्यात कोणीच शिल्लक राहणार नाही," असं अधिकारी म्हणाले. अमित शाह यांचाही हल्लाबोलममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. राज्याचा विकास करण्याचं सोडून ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडलं, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणी