शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले, माजी  मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 18:22 IST

सहा वेळा आमदारपद भूषवविणारे जगदीश शेट्टर सातव्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत

चंद्रकांत कित्तुरेहुबळी : मला आता कोणतीही राजकीय आकांक्षा राहिलेली नाही. विधानसभेत निरोपाचे भाषण करुन सन्मानपूर्वक निरोप घ्यायचा तेवढीच इच्छा होती. पक्षाला ती कळविली होती. मात्र उमेदवारी नाकारुन भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले. हा आत्मसन्मान कायम राखण्यासाठीच काँग्रेसकडून निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी लोकमतशी बोलताना केले.सहा वेळा आमदारपद भूषवविणारे जगदीश शेट्टर सातव्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हुबळी येथील आपल्या निवासस्थानालाच त्यांनी कार्यालयाचे स्वरुप दिले आहे. गुरुवारी सकाळी या कार्यालयातच त्यांची भेट घेतली. हावेरी जिल्ह्यातील हिरेकेरुर येथील काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या सभेच्या तयारीसाठी तिकडे रवाना होण्याच्या तयारीत ते होते. त्यामुळे घाईघाईतच ते प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलले.

काँग्रेस मानवतावादी विचारांचा पक्षआपली संपूर्ण राजकीय कारकीर्द भाजपमध्ये गेली आहे. वैचारिकदृष्ट्याही काँग्रेस आणि भाजप वेगळे आहेत त्यामुळे काँग्रेसकडून लढताना, भाजपच्या मतदारांना सामोरे जाताना अडचण होत नाही का? या प्रश्नावर शेट्टर म्हणाले, काँग्रेस हा मानवतावादी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. मतदारांचे म्हणाल तर सुरवातीला थोडे अडचणीचे वाटले पण कार्यकर्ते आणि नागरिकांना मी काय आहे हे माहीत असल्याने त्यांनीही मला समजून घेतले आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे निवडून येण्यात कोणतीही अडचण वाटत नाही.

भाजपला मीच उभे केले

भाजपचे उमेदवार महेश टेंगिनकाई तर तुम्हाला गुरू मानतात. यावर काय सांगाल. टेंगिनकाई माझे सहकारी होते. मात्र ते बी.एल संतोष यांच्या अधिक जवळचे होते. त्यांच्यासाठी संतोष यांनीच माझ्या उमेदवारीला खोडा घातला. हुबळीत मी १९९४ पासून मी आमदार आहे. भाजपला मीच येथे उभे केले आहे. हुबळीसह जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. अजूनही सुरू आहेत. माझ्याविरोधात नागरिकांत अजिबात असंतोष नाही त्यामुळे मला येथे काहीच अडचण नाही असे शेट्टर यांनी सांगितले.

त्यांच्याबद्दल आदरच

काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी आपल्या कार्यालयात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो आहेत याबाबत विचारता शेट्टर म्हणाले, मला भाजपने दुखावले आहे. कार्यकर्ते फोटो काढत होते. पण मीच त्यांना थांबवले. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहेच.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगाव