शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

भाजप सरकार धोकेबाज : यलगुलवार काँग्रेसचा मोर्चा : चारा छावण्या सुरु करा, शेतकर्‍यांना मदत द्या !

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर केवळ पोकळ घोषणाबाजी केली आहे. हे सरकार धोकेबाज असून, या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी येथे केले.

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर केवळ पोकळ घोषणाबाजी केली आहे. हे सरकार धोकेबाज असून, या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी येथे केले.
केंद्र व राज्य शासनाच्या हुकूमशाही मानसिकतेचा आणि जनतेची मुस्कटदाबी करण्याच्या तंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष यलगुलवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
यलगुलवार पुढे म्हणाले की, मोठय़ा अपेक्षेने जनतेने भाजपला निवडून दिले. पण निवडणुकीत त्यांनी दिलेले एकही आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. शेती, उद्योग, व्यापार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारांना काम, शेतकर्‍यांना कर्जमुक्ती, मदत, दुष्काळ निवारण उपाययोजना, पाणीपुरवठा, कांदा, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, भ्रष्टाचार या सर्व पातळ्यांवर केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे सरकार केवळ घोषणा करणारे व धोकेबाज आहे. त्यामुळे या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन यलगुलवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केले. यावेळी महापौर सुशीला आबुटे, प्रदेश सचिव धर्मा भोसले, सुधीर खरटमल, माजी आ. निर्मलाताई ठोकळ, माजी महापौर अँड. यु. एन. बेरिया, मनपा सभागृह नेते संजय हेमगड्डी यांची भाजप सरकारवर हल्लाबोल करणारी भाषणे झाली.
काँग्रेस भवन येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे जंबो शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात प्रदेश सचिव सुरेश पाटोळे, युवक अध्यक्ष अमोल शिंदे, सेवादल अध्यक्ष अशोक कलशे?ी, एनएसयुआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, अनिल आबुटे, माणिकसिंग मैनावाले, सिध्दाराम चाकोते, अश्विनी जाधव, अजय दासरी, राहुल गायकवाड, भारत जाधव, देवेंद्र भंडारे, आरिफ शेख, अनिता म्हेत्रे, सरस्वती कासलोलकर, मंदाकिनी तोडकरी, र्शीदेवी फुलारे, अंबादास गुत्तीकोंडा, आझम सैफन, राजन कामत, केशव इंगळे, उपेंद्र ठाकर, मनोज यलगुलवार, पांडुरंग चौधरी, किसन मेकाले, ए. डी. चिनीवार, शरणप्पा दुर्लेकर, अरविंद भांडेकर, नामदेव राठोड, नरसिंग कोळी, सिद्राम अ?ेलूर, जेम्स जंगम, नृसिंह आसादे, बाबू विटे, करण म्हेत्रे, नामदेव राठोड, हसीब नदाफ, वीणा देवकते, बसवराज म्हेत्रे, नरेंद्र इंगळे, राजाभाऊ सलगर, अनिल म्हस्के, बजरंग जाधव, अविनाश जाधव, उमेश सुर्ते, विवेकानंद कंदकुरे, करण म्हेत्रे, जॉन फुलारे, सुमन जाधव, हेमा चिंचोळकर, परशुराम सतारवाले, सूर्यकांत शेरखाने, बाबा करगुळे, विनोद भोसले, नागनाथ कदम, विजय साळुंके, राजेश झंपले, रमेश फुले, विजय भोसले, भगवान गायकवाड, शिवाजी कदम, हाजीमलंग नदाफ, लतीफ मल्लाबादकर, हारुन शेख, लतीफ शेख, करीम शेख, गुलाम शेख, शकुर शेख, बशीर शेख, सादिक शेख, वाहिद नदाफ, डॉ. अप्पासाहेब बगले, संजय गायकवाड, मधुकर कांबळे, बाबू विटे, बाबू म्हेत्रे, रविप्रभा लोंढे, प्रमिला तुपलवंडे, आरती हबीब, संध्या काळे, शोभा बोबे, मल्लेश सूर्यवंशी, पंडित गणेशकर, र्शीराम काडादी, सोपान थोरात, धैर्यशील बाबरे, शिवाजी जाधव, विजय जाडकर, राजू जाडकर, राजू बनसोडे, मळसिध्द कोळी आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
इन्फो
.. या केल्या मागण्या
जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना मदत द्या
शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करा
दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर करा
शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी मदत द्या
गारपीटग्रस्तांना मदत करा
भाववाढ रोखा
इन्फा
उपजिल्हाधिकारी संतापले
काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच तेथून निवेदन देण्यासाठी पाच ते सहा जणांचे शिष्टमंडळ जाण्याऐवजी शंभर ते दीडशे जणांचा नेते व कार्यकर्त्यांचा जथ्था हातात झेंडे व फलक घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमख यांच्या कार्यालयात घुसला. यामुळे कार्यालयात प्रचंड गर्दी आणि दाटीवाटी झाली. यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी चांगलेच संतापले. पाच-सहा जणांचे शिष्टमंडळ सोडून एवढी गर्दी का?, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा फोटो काढेपर्यंत राहू द्या, असे सांगून स्थानिक नेत्यांनी फोटोसेशन झाल्यानंतर कार्यकर्त्यांना बाहेर काढले.
फोटो ओळी