शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

भाजपाचा शिवसेनेला प्रस्ताव नाही

By admin | Updated: October 21, 2014 03:02 IST

अपक्ष व छोटे पक्ष यांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत

मुंबई : अपक्ष व छोटे पक्ष यांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत. निवडणूक निकालानंतर २४ तास उलटले, तरीही भाजपाने सत्तेत सहभागी होण्याचा कुठलाही प्रस्ताव शिवसेनेकडे धाडलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधी पक्षात बसायचे, या निर्णयाचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत जनतेच्या आभाराचा ठराव मांडण्यात आला. त्यावर बोलताना शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी यंदाची निवडणूक कशी वेगवेगळ््या अर्थाने महत्वाची होती ते स्पष्ट केले. ‘भाजपाकडून अजून कुठलाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. आपण सरकारला पाठिंबा देण्याचा प्रश्न अहंकाराचा विषय केलेला नाही. भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचा दूरध्वनी केला होता. त्यांनी काही सन्मानजनक प्रस्ताव पाठवला तर त्यावर शिवसेना नक्की विचार करील. मात्र त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार बनवायचे असेल तर ते बनवू शकतात,’ असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तशीच वेळ आली तर विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवावी लागेल, असे संकेत उद्धव यांनी दिले. येत्या महापालिका निवडणुकीत स्वबळावर जिंकण्याच्या तयारीला लागण्याचे आवाहन उद्धव यांनी केले.