शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपशी युतीला आता उशीर झाला : द्रमुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:30 IST

द्रमुकशी युती होऊ शकते, असे भाजपच्या सूत्रांनी म्हटले असले तरी आता खूप उशीर झाला, असे त्याच्या नेत्यांनी म्हटले.

ठळक मुद्दे एम.के. स्टालीन यांनी भाजपसोबत युतीसाठी कोणतीही बोलणी असल्याचे लगेचच नाकारले.

चेन्नई : द्रमुकशी युती होऊ शकते, असे भाजपच्या सूत्रांनी म्हटले असले तरी आता खूप उशीर झाला, असे त्याच्या नेत्यांनी म्हटले.द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. ही भेट अराजकीय होती, की २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांत जवळीक वाढत असल्याचे संकेत त्यांनी दिले? द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला दुबळे करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचे द्रमुकसोबत असलेल्या पक्षांचे मत आहे. मोदी यांनी करुणानिधी यांना आपल्या दिल्लीतील निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले. द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम.के. स्टालीन यांनी भाजपसोबत युतीसाठी कोणतीही बोलणी असल्याचे लगेचच नाकारले. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या विरोधातील द्रमुक आणि त्याच्यासोबतच्या पक्षांनी तामिळनाडूत ८ नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ पाळण्याची तयारी सुरू केली होती; परंतु मोदी-करुणानिधी भेटीने त्यांच्या छावणीत संभ्रम निर्माण झाला आहे.लोकसभेसाठी अखिल भारतीय अण्णाद्रमुकसोबत युती करण्याची भाजपची सगळी तयारी झाल्याचे दिसत असले तरी नुकत्याच झालेल्या जनमत चाचणीत त्या पक्षाच्या विश्वासार्हतेची पातळी फारच खालावल्याचे दिसल्यानंतर भाजपने दिशा बदलली व जिंकणाºया घोड्यासोबत जायचे ठरवले. द्रमुकसोबत १९९९ व २००४ मध्ये आमची युती होतीच. त्यामुळे आता युती करण्यात काहीच चूक नाही, असे सूक्ष्म संकेत भाजपच्या नेत्यांनी दिले आहेत.द्रमुकने १९९६ आणि १९९८ मध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवली होती; परंतु १९९९ मध्ये जयललिता यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार एक मताने पाडल्यानंतर भाजप द्रमुकच्या जवळ गेला होता.