शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

भाजपा युतीनं 34 आमदारांसह मेघालयात केला सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेस सत्तेपासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 20:13 IST

मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे.

शिलाँग- मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांच्यासमोर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपा 2, एनपीपी 19, यूडीपी 6, एचएसपीडीपी 2, पीडीएफ 4 आणि 1 अपक्षासह 34 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवण्यात आलं आहे. आता फक्त राजभवनाकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील देण्याची औपचारिकताच बाकी आहे.तसेच नॅशनल पीपल्स पार्टी(एनपीपी)चे अध्यक्ष कोनराड संगमा यांना मुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. एएनआयच्या मते, मंगळवारी सकाळी 10.30 वाजता कोनराड संगमा यांचा शपथविधी होणार आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर कोनराड संगमा म्हणाले, आम्ही 34 आमदारांच्या समर्थनासह सरकार स्थापनेचा दावा केला आहे. पुढे दोन-तीन दिवस महत्त्वाचे आहेत. सद्यस्थितीतील सरकारचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपणार आहे आणि त्यापूर्वीच सरकार स्थापणं गरजेचं आहे. उद्यापर्यंत सर्व काही स्पष्ट होईल. ज्यावेळी पत्रकारांनी संगमांना मुख्यमंत्रिपदासंदर्भात छेडले, त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रिपदासाठी इतर सहयोगी पक्षांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. इतर पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवणं सोपं नाही हे संगमांना चांगलंच ठाऊक आहे. 

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्याही हालचालीमेघालयात काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अहमद पटेल आणि कमल नाथ हे लगेचच शिलाँगमध्ये दाखल झालेत. राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. भाजपानेही कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहचून देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यातही भाजपाच्या निकालानंतरच्या मॅनेजमेंटमुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे मेघालयमध्येही असाचा काही चमत्कार पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.