शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Mehbooba Mufti : "गुपकर आघाडीच्या एकजुटीची केंद्र सरकारला भीती," मेहबुबा मुफ्तींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 09:04 IST

Mehbooba Mufti : गुपकर आघाडीच्या राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे आणि सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याची आवश्यकता असल्याचं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं.

केंद्र सरकारला गुपकर आघाडीच्या (पीएजीडी) नेत्यांच्या एकजुटीची भीती वाटते, त्यामुळे सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांना का समन्स पाठवले हे समजणे कठीण नसल्याचे वक्तव्य जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर वक्तव्य केले.

“काही बोलण्याची गरज आहे का? फारूख अब्दुल्ला यांना का बोलावण्यात आलं हे समजण्यासाठी तुम्हाला रॉकेट सायन्सची गरज आहे का? भारत सरकारला गुपकर आघाडीची भीती वाटते. आम्ही एकत्र आलो तर जम्मू काश्मीरबाबत त्यांनी भयावह योजना अयशस्वी होईल याची त्यांना भीती आहे,” असं मुफ्ती एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. फारूख अब्दुल्ला हे गुपकर आघाडीचे अध्यक्षदेखील आहेत.

“आम्हाला लोकांमध्ये जाऊन काम करायचं आहे. आम्ही अनेकदा काही गोष्टींचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या घराचे दरवाजे बंद आहेत, हे तुम्हाला माहित आहे. मला एका जखमी काश्मीरी पंडिताच्या घरी जायचं होतं. परंतु मला परवानगी देण्यात आली नाही. अशा स्थितीत आम्हाला आमची जागा शोधत त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावायचे आहेत. केंद्र सरकारला आमच्या राजकीय कारवायांची भीती वाटते. त्यांनी आम्हाला बदनाम करायला सर्वकाही केलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

एकजुटीची गरज"गुपकर आघाडीच्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्याची गरज आहे, कारण ते आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतील,” असंही मुफ्ती यावेळी म्हणाल्या. ५ ऑगस्ट २०१९ नंतर दिल्लीतून जे आदेश येत आहेत त्यावरून नोकऱ्या, जमीन, संसाधने विक्रीसाठी आहेत असं दिसतं. जोपर्यंत आम्ही एकजुट होत नाही आणि विरोध करत नाही, तोवर ते आमच्या अस्थित्वाला नष्ट करण्याचे ते प्रयत्न करतील असा आरोपही मुफ्ती यांनी केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला