शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

राष्ट्रपतिपदासाठी भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद

By admin | Updated: June 20, 2017 03:04 IST

बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची अचानक राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून भाजपाने सोमवारी सर्वांनाच धक्का दिला.

हरिष गुप्ता/शीलेश शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची अचानक राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून भाजपाने सोमवारी सर्वांनाच धक्का दिला. दलित वर्गात मोडणाऱ्या कोळी समाजाच्या नेत्याला राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने, काँग्रेस व अन्य विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिजू जनता दलाने कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. रालोआचा उमेदवार २३ जून रोजी ठरणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपाच्या संसदीय बोर्डाने कोविंद यांच्या नावावर आजच शिक्कामोर्तब केले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषण केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोविंद यांना फोन करून त्यांचे अभिनंदनही केले.भाजपाच्या पद्धतीबाबत विरोधकांनी नापसंती व्यक्त केली. सहमती एकतर्फी होत नाही, असे येचुरी म्हणाले. भाजपाने सहमतीचे नाटक केले, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनीही केली.शिवसेनेची नाराजी, आज निर्णयकेवळ दलित समाजाची मते मिळविण्यासाठी जर दलित उमेदवार दिला जात असेल, तर त्यात आम्हाला रस नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी रामनाथ कोविंद यांची उमेदवारी शिवसेनेला मान्य नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उद्या शिवसेना नेत्यांची बैठक आयोजित केली असून, त्यात आपली भूमिका ठरवली जाईल, असेही उद्धव म्हणाले.पंतप्रधान मोदींनी केले फोनपंतप्रधानांनी चंद्रबाबू नायडू, प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, के. चंद्रशेखर राव, नितीश कुमार, नवीन पटनाईक, ममता बॅनर्जी यांना या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधानांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही पक्षाचा निर्णय फोनवरून सांगितला. नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री असल्याने त्यांना हा निर्णय सांगणे अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांना अमित शहा यांनी फोन केला.विरोधकांची बैठक २२ जूनलामोदी यांच्या फोननंतर सोनिया गांधी यांनी लगेचच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आणि त्यांना कोविंद यांच्या उमेदवारीची माहिती दिली. त्यानंतर, त्यांनी लालुप्रसाद यादव, नितीश कुमार, सीताराम येचुरी यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्या सर्वांची बैठक २२ जून रोजी होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसही त्यात सहभागी होणार आहे. आनंद, पण... राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर होणे ही व्यक्तिश: माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पक्ष म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही, हे मी आताच सांगू शकत नाही. (बिहारचे) राज्यपाल म्हणून कोविंद यांनी निष्पक्षतेने अनुकरणीय काम केले आहे. त्यांनी राज्य सरकारशी आदर्शवत संबंध ठेवले आहेत.-नितीश कुमार, मुख्यमंत्री बिहारसकारात्मक, पण..!रामनाथ कोविंद दलित आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे, परंतु रालोआने एखाद्या अराजकीय दलित व्यक्तीला उमेदवारी दिली असती, तर (अधिक) चांगले झाले असते. आता विरोधी पक्षही एखाद्या राजकीय दलित नेत्याचे नाव जाहीर करणार नाही, अशी आशा आहे.- मायावती, अध्यक्ष, बसपा