शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये भाजपा, जेडीयू लढणार प्रत्येकी १७ जागा, तर पासवान यांना सहा जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:01 IST

बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीत लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून कुरबुरी सुरू असताना भाजपा, जनता दल युनायटेड (जेडीयू)स लोक जनशक्ति पार्टी (एलजेपी) यांच्या युतीने जागावाटप जाहीरही केले.

- ए. पी. सिन्हा  पाटणा  - बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीत लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरून कुरबुरी सुरू असताना भाजपा, जनता दल युनायटेड (जेडीयू)स लोक जनशक्ति पार्टी (एलजेपी) यांच्या युतीने जागावाटप जाहीरही केले. त्यानुसार बिहारमध्ये भाजप व जेडीयू प्रत्येकी १७ तर रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी ६ जागा लढविणार आहे. गेल्या वेळी भाजपाने बिहारच्या ३0 जागा लढवल्या होत्या.जेडीयूला कटिहार, पूर्णिया, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, काराकाट, गया, जहानाबाद, सुपौल,किशनगंज, मधेपुरा, वाल्मिकीनगर, सीतामढी, झंझारपूर या लोकसभा जागा मिळाल्या आहेत. तर भाजपाच्या वाट्याला पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य, महाराजगंज, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुजफ्फरपूर, सारण, उजियारपूर, बेगूसराय, पाटणासाहिब, पाटलीपुत्र, आरा, शिवहर, बक्सर, सासाराम, औरंगाबाद हे लोकसभा मतदारसंघ आले आहेत. तर पासवान यांच्या एलजेपीला वैशाली, समस्तीपूर, हाजीपूर, खगडिया, जमुई, नवादा या लोकसभेच्या सहा जागा देण्यात आल्या आहेत.२००४नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकांत या तीन पक्षांच्या युतीला ४५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मोदी यांची बिहारमध्ये लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा राज्यकारभार व रामविलास पासवान यांची मजबुत साथ यांच्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांत आपलीच युती जिंकेल असा विश्वास या नेत्यांना वाटत आहे. मात्र राज्यात १३ जागा अशा आहेत की, तिथे मुस्लीम व यादव ज्याच्या बाजूने मतदान करतील तोच विजयीहोईल.सिन्हा, गिरीराज सिंह यांचा पत्ता कटशत्रुघ्न सिन्हा यांना यंदा भाजपा उमेदवारी देणार नाही, हे स्पष्ट आहे. ते ज्या ठिकाणहून निवडून येते होते, त्या पाटलीपुत्र मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद निवडणूक लढवतील, असे दिसत आहे. सिन्हा बहुधा राजदतर्फे निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. नवादा मतदारसंघातून भाजपाचे वादग्रस्त नेते गिरीराज सिंह निवडून आले होते. पण ती जागा यंदा लोकजनशक्ती पार्टीला मिळाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक