शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

भाजप आणि काँग्रेसमध्ये पेटले वाक्युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2015 00:01 IST

भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणणारा आयपीएलचा घोटाळेबाज माजी आयुक्त ललित मोदी याने आता आपला मोर्चा काँग्रेसकडे वळविला आहे

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणणारा आयपीएलचा घोटाळेबाज माजी आयुक्त ललित मोदी याने आता आपला मोर्चा काँग्रेसकडे वळविला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका व जावई रॉबर्ट वाड्रा हे लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये आपल्याला भेटले होते, असा दावा त्याने केला आहे. मोदीच्या या टिष्ट्वटबॉम्बनंतर काँग्रेस व भाजपत वाक्युद्ध पेटले आहे.आतापर्यंत बचावात्मक पवित्र्यात असलेल्या भाजपने काँग्रेसला या भेटीमागील हेतू स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने ललित मोदीचा दावा फेटाळताना एखाद्या रेस्टॉरंटमध्ये अचानक एकमेकांपुढे येणे हा काही गुन्हा नाही, असे स्पष्ट केले आहे.ललित मोदी व गांधी कुटुंबातील संबंधांमुळेच संपुआच्या काळात माजी आयपीएल प्रमुखाचे प्रत्यार्पण होऊ शकले नाही, असा आरोप भाजपने केला आहे. सोनिया गांधी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. भाजपच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने ललित मोदी यांचे टिष्ट्वट म्हणजे छोट्या मोदीने (ललित मोदी) खोटारडेपणा करून मोठ्या मोदीची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) मदत करण्याचा प्रयत्न आहे, असा घणाघाती आरोप केला. या मुद्यावर काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले की, ललित मोदीने गांधी कुटुंबियांचीही भेट घेतली होती हे आता उघड झाले आहे. त्याने प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांना भेटण्यामागे कारण काय होते? गांधी कुटुंब मागील काही वर्षांपासून मोदीच्या संपर्कात का होते हे स्पष्ट झाले पाहिजे. भाजपच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला चढविताना ललित मोदी भाजपच्या इशाऱ्यावर मूळ मुद्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. रेस्टॉरंटमध्ये अचानक कुणी भेटले तर तो गुन्हा ठरत नाही, असे या पक्षाचे म्हणणे आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, भाजपने आपल्या लोकांना या मुद्यावर लोकांची दिशाभूल करू नका, असे सांगितले पाहिजे व सरकारने परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील आरोपांबाबत देशवासीयांना स्पष्टीकरण द्यावे. दरम्यान, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या समर्थनात आमदारांनी स्वाक्षरी मोहीम उघडली असून १२० आमदारांचे हस्ताक्षर घेण्यात आले असल्याच्या वृत्ताचा मुख्यमंत्री कार्यालयाने इन्कार केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात मुख्यमंत्री दर शुक्रवारी लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेत असतात. आमदार आणि कार्यकर्त्यांचे त्यांना भेटणे हा त्याचाच एक भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना व्यक्तिश: फोन करून आपल्या प्रति इमान राखण्याचे आणि समर्थनात पुढे येण्याचे आवाहन केले असल्याचे वृत्त कार्यालयाने फेटाळले आहे.ललित मोदी स्वत:च्या बचावासाठी निराधार आरोप करीत असल्याचा दावा केंद्रीय कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी केला आहे. मोदीने प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्राचे नाव घेतले. उद्या तो आणखी कुणाचे नाव घेईल. आपल्याविरुद्धच्या खटल्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असे गौडा यांनी सांगितले.