शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही", बीरभूम हिंसाचार प्रकरणी ममतांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:55 IST

Birbhum Violence Case: 'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागवला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनीही राज्यातील ममता सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, काहींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर काहींनी पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करण्याची मागणी करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे.दरम्यान, विरोधकांच्या हल्ल्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "कोणत्याही नागरिकाला त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. बीरभूम, रामपुरहाट घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी तात्काळ ओसी, एसडीपीओ यांना हटवले आहे आणि मी स्वतः उद्या रामपूरहाटला जाणार आहे. मी बीरभूम हत्याकांडाचे समर्थन करत नाही, पण अशा घटना यूपी, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये अधिक आहेत आणि हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही. या घटनेचे राजकारण करूनही हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कारवाई केली जाईल."

राज्यात कलम 355 लागू केले पाहिजे - अधीर रंजन चौधरीदरम्यान, बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. तेथील लोक भीतीने जगत असून त्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात कलम 355 लागू केले पाहिजे.

भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल हिंसाचाराच्या या प्रकरणावरून भाजपने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.  भाजपच्या पाच खासदारांचे पथक आज घटनास्थळी पोहोचणार आहे.  पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता येथे सांगितले की, "संपूर्ण राज्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या एका आठवड्यात राज्याच्या विविध भागात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कायदा आणि पश्चिम बंगालमध्ये सुव्यवस्था बिघडली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल