शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गुजरातमध्ये भूकंप; बिपरजॉयमुळे राज्यात अलर्ट जारी, हजारोंचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:59 IST

गुजरातच्या कच्छमध्ये सायंकाळी 5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Biparjoy Cyclone: बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये यंत्रणा अलर्टवर आहेत. यादरम्यान, गुजरातच्या कच्छमध्ये बुधवारी सायंकाळी 5.5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी होती. यापूर्वी, दुपारी 4.15 वाजता जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड भागातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता 3.4 इतकी होती.

भूकंपाचे केंद्र नैऋत्येला 5 किमी अंतरावर होते. विशेष म्हणजे, मंगळवारी दुपारीही राजधानी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भारतासह पाकिस्तान आणि चीनमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी मोजली गेली.

चक्रीवादळ गुजरातसाठी चिंतेचा विषय बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातसाठी चिंतेचा विषय बनला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर आता गुजरातकडे येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ उद्या (गुरुवार) 15 जून रोजी राज्यात धडकणार आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या 17 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कच्छमध्ये 4, द्वारका आणि राजकोटमध्ये 3-3, जामनगरमध्ये 2 आणि पोरबंदरमध्ये 1 टीम तैनात आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमधील पोरबंदर आणि द्वारकाच्या समुद्र किनाऱ्यावरून जाऊ शकते.

45 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलेबिपरजॉयमुळे गुजरात महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय वेगाने गुजरातकडे सरकत आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी द्वारका, कच्छ, पोरबंदर, नवसारीसह अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 45 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. याशिवा, अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. काही भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे.

टॅग्स :GujaratगुजरातEarthquakeभूकंपcycloneचक्रीवादळ