शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अब्जाधीशांची संपत्ती ११% वाढली; अंबानी, बालकृष्ण, दमानी श्रीमंतांच्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:42 IST

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत रामदेवबाबाप्रणीत पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकृष्ण दमानी यांनी ‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या २0१७ च्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यादीतील अब्बाधीशांची श्रीमंती ११ टक्क्यांनी वाढली आहे.

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत रामदेवबाबाप्रणीत पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकृष्ण दमानी यांनी ‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या २0१७ च्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यादीतील अब्बाधीशांची श्रीमंती ११ टक्क्यांनी वाढली आहे.‘हुरुन’ने जारी केलेल्या श्रीमंतांच्या सहाव्या वार्षिक यादीनुसार, रिलायन्सच्या समभागांनी जोरदार उसळी घेतल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल ५८ टक्के वाढ झाली आहे.त्यांची संपत्ती आता २.५७ लाख कोटी झाली आहे. अंबानी हे सलग सहाव्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. हुरुनच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते आता १५ व्या स्थानी पोहोचले आहेत. अंबानी यांची संपत्ती येमेनच्या सकळ राष्टÑीय उत्पन्नापेक्षा ५0 टक्के जास्त आहे.पतंजलीचे सीईओ बालकृष्ण हे आता भारतातील ‘टॉप टेन’ श्रीमंतांत समाविष्ट झाले आहेत. गेल्या वर्षी २५ व्या स्थानी असलेले बालकृष्ण यंदा आठव्या स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती १७३ टक्क्यांनी वाढून ७0 हजार कोटी रुपये झाली आहे. वित्तवर्ष २0१७ मध्ये पतंजलीची उलाढाल १0,५६१ कोटी रुपये झाली. पतंजली आता जागतिक पातळीवरील बड्या ब्रँडच्या स्पर्धेत आली आहे.डी-मार्टच्या दमानी यांची संपत्ती सर्वाधिक ३२१ टक्क्यांनी वाढली आहे. अनुराग जैन आणि एन्ड्युरन्स टेकच्या परिवाराची संपत्ती २८६ टक्क्यांनी वाढली आहे.हुरुनच्या अहवालात संपत्तीच्या मोजदादीसाठी ३१ जुलैची आकडेवारी गृहीत धरण्यात आली आहे. डॉलर आणि रुपयाचा विनियम दर त्या दिवशी ६४.१ होता.क्रमवारीत ५१ स्त्रियांचाही समावेशमीडिया डॉट नेटचे दिव्यांक तुराखिया वयाच्या ३४ व्या वर्षी स्वबळावर अब्जाधीश बनले आहेत. ४0 वर्षांखालील स्वबळावरील पहिल्या पाच अब्जाधीशांत त्यांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व जण तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक आहेत.बंगळुरूस्थित ४२ वर्षीय अंबिका सुब्रमण्यम या सर्वांत तरुण स्वबळावरील अब्जाधीश महिला बनल्या आहेत. त्यांनी मु-सिग्मामधील आपले समभाग विकले आहेत. या कंपनीच्या त्याही एक सहसंस्थापक होत्या. श्रीमंतांच्या या यादीत ५१ महिलांचा समावेश आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी