शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाकविरोधी कायदा बनविणार, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 06:32 IST

मुस्लीम समाजात प्रचलित असलेली प्रथा हा कायद्याने गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करणारे एक विधेयक सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : पतीने तीन वेळा ‘तलाक’ असे म्हणून पत्नीला तत्काळ घटस्फोट देण्याची मुस्लीम समाजात प्रचलित असलेली प्रथा हा कायद्याने गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करणारे एक विधेयक सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. ते मंजूर व्हावे, यासाठी हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करेल, असे सांगण्यात येते.सर्वोच्च न्यायालयाने याआधीच तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तसा कायदा करण्यासाठी हे विधेयक आणण्याची सरकारची तयारी सुरू आहे. केवळ सर्वोच्च न्यायालयाने असा तलाक घटनाबाह्य ठरवून चालणार नाही. जोपर्यंत तसा कायदा होत नाही, तोपर्यंत पोलीस त्याविषयीच्या तक्रारींबद्दल कारवाईच करू शकणार नाहीत. त्यामुळेच त्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. माहीतगार सूत्रांनुसार अशा कायद्याच्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्र्यांची एक समिती नेमण्यात आली असून हा मसुदा लवकरच सरकारला सादर केला जाणे अपेक्षित आहे.>महिलांना दिलासा मिळेलया कुप्रथेची झळ सोसावी लागणा-या घटस्फोटितांना सध्या न्याय मागण्याचे काही साधन नाही. पतीने दिलेला तलाक धर्मगुरू रद्द करू शकत नाहीत आणि कायद्यात तरतूद नसल्याने पोलिसांकडे जाऊनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे हा नवा कायदा अशा महिलांना दिलासा देणारा ठरू शकेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेससह जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी उघड वा सावधपणे स्वागत केले होते. त्यामुळे हे विधेयक सहजपणे मंजूर होईल, असा अंदाज केंद्रातील एका मंत्र्याने व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्रिपल तलाक’ घटनाबाह्य घोषित केला. त्यानंतर मुस्लीम व्यक्तिगत कायदे मंडळाने धर्मसंमत तलाक कसा द्यावा याची सुधारित नियमावली जारी केली. तरी मुस्लिमांमध्ये ही प्रथा अजूनही सुरूच आहे. एवढेच नव्हे तर व्हॉट्सअ‍ॅप व एसएमएसने असे घटस्फोट दिले गेल्याची काही प्रकरणे उजेडात आली होती.

टॅग्स :Muslimमुस्लीमGovernmentसरकार