शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वडील कोर्टात जाऊ शकले नाहीत, SDO ने मुलाला पाठवले तुरुंगात... वाचा पुढे काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 09:50 IST

एसडीओने उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने एसडीओचे अपील फेटाळले आणि सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

छत्तीसगडमधील बिलासपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती आजारपणामुळे न्यायालयात हजर राहू शकली नाही. याबाबतची माहिती देण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला पाठवले. पण, एसडीओने त्याला १५ दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. हे प्रकरण सत्र न्यायालयात पोहोचल्यावर तुरुंगात पाठवलेल्या मुलाला २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा निकाल देण्यात आला. 

या आदेशाविरुद्ध एसडीओने उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने एसडीओचे अपील फेटाळले आणि सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. पीडित तरुणाला २५ हजार रुपये भरपाई द्यावी लागेल, असे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, तखतपूरच्या जोरापारा येथे राहणारे साधराम सतनामी हे मजूर असून त्यांचे वडील जोतराम सतनामी यांनी सरकारी जमिनीवर घर बांधले होते.

या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच तत्कालीन एसडीओ महसूल कोटा यांनी एक पथक घटनास्थळी पाठवून अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आणि ५०० ​​रुपयांचा दंडही ठोठावला. यानंतर न्यायालयात हजर राहणाच्या दिवशी जोतराम हे आजारपणामुळे  न्यायालयात पोहोचू शकले नाहीत, याची माहिती देण्यासाठी त्यांनी आपला मुलगा साधराम यांना पाठवले.

एसडीओने १५ दिवसांसाठी पाठवले तुरुंगातसाधराम हे न्यायालयात येऊन वडील आजारी असल्याची माहिती दिली, तेव्हा एसडीओ आशुतोष अवस्थी यांनी साधराम यांना १५ दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. यावेळी साधराम यांनी वारंवार विनंती करत आपण खरं बोलतोय, तुरुंगात पाठवू नये, असे सांगितले. मात्र, एसडीओ यांनी साधराम यांचे म्हणणे ऐकून न घेता, त्यांना तुरुंगात पाठवले.

उच्च न्यायालयाने हा आदेश दिलातुरुंगातून आल्यानंतर पीडित साधराम यांच्या कुटुंबीयांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर एडीजे यांनी पीडितेला २५ हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले. सध्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आशुतोष अवस्थी यांनी याविरोधात उच्च न्यायालयात अपील केले. न्यायाधीश राकेश मोहन पांडे यांच्या एकल खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवत अपील फेटाळले.

टॅग्स :Courtन्यायालयChhattisgarhछत्तीसगड