दुचाकींची समोरासमोर धडक; तीन जण जखमी
By admin | Updated: July 16, 2016 23:47 IST
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी एक तरुण गंभीर जखमी आहे, ही घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली.
दुचाकींची समोरासमोर धडक; तीन जण जखमी
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी एक तरुण गंभीर जखमी आहे, ही घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, तुळशिराम आत्माराम फुलपगारे (वय ४५) व अमोल फुलपगारे हे पिता-पूत्र इच्छादेवी चौकातील आपले सलूनचे दुकान बंद करुन घरी जात असताना विनोद हॉस्पिटलनजीक एक ट्रक (एम.एच. ४० ए.के. २१७३) उभा होता, त्यातच समोरुन एक दुचाकी आली व समारोसमोर टक्कर झाली. अंधार असल्याने हा अपघात झाला. त्यात फुलपगारे पिता-पूत्र व कुणाल रवींद्र चौधरी (वय २९) हा जखमी झाला. त्यात अमोलच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या तिघांना विनोद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती मिळाली.