अहमदपूर : घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना शहरातील बागवान गल्ली येथे घडली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात रविवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर येथील मोईज अजिज कादरी हे आपल्या घरासमोर एमएच २४ वाय ८४४३ ही दुचाकी उभी केली होती. १७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी कादरी यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुचाकीची किंमत २५ हजार रुपये आहे. (वार्ताहर)
दुचाकी पळविली
By admin | Updated: October 27, 2015 00:24 IST