छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवानांना हौतात्म्य आलं आहे. दरम्यान, यापूर्वी छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार चकमकीनंतर कमीतकमी १५ जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजी डी.एम. अवस्थी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २२ जवानांचं पार्थिव आतापर्यंत सापडल्याचं सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलावर नक्षलवादी संघटना पीपल्स लिबरेशन ग्रुप आर्मी प्लाटून वनच्या युनिटनं केला होता. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परंतु सुरक्षा दलाचे जवान ज्यावेळी आत शिरत होते त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तीन प्रकारे त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. सुरूवातीला बुले, त्यानंतर अन्य हत्यारं आणि रॉकेट लाँचरनं २००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं.
नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद; रॉकेट लाँचर, LMG नं केला होता हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 13:53 IST
२००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं.
नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद; रॉकेट लाँचर, LMG नं केला होता हल्ला
ठळक मुद्दे२००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं. यापूर्वी जवान बेपत्ता असल्याचं आलं होतं सांगण्यात.