शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये सत्तासंघर्ष!

By admin | Updated: February 10, 2015 03:19 IST

बिहारमधील सत्तासंघर्षातून घटनात्मक पेच वाढला असून, संयुक्त जनता दलाचे नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार आणि पक्षाचा आदेश धुडकावून मुख्यमंत्रिपदावर कायम राहणारे जितनराम मांझी

पाटणा/नवी दिल्ली : बिहारमधील सत्तासंघर्षातून घटनात्मक पेच वाढला असून, संयुक्त जनता दलाचे नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार आणि पक्षाचा आदेश धुडकावून मुख्यमंत्रिपदावर कायम राहणारे जितनराम मांझी यांच्यात आरपारची लढाई सुरू झाली आहे. उभयतांनी सोमवारी येथे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन विश्वासमत आपल्याकडेच असल्याचा दावा केला. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.दरम्यान, संयुक्त जनता दलाने पक्षासोबत बंडाळी करून मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार देणारे आणि नितीशकुमार यांच्या मार्गातील काटा बनलेले जितनराम मांझी यांच्यावर बेशिस्त वागणुकीचा ठपका ठेवीत अखेर त्यांना बडतर्फ केले आणि ४८ तासांच्या आत मांझी यांना विधानसभेत शक्तिपरीक्षण करण्यास सांगण्यात यावे, अशी विनंती राज्यपाल त्रिपाठी यांना केली. मांझींनी विधानसभेत शक्तिपरीक्षणाशिवाय राजीनामा देण्यास नकार दिल्याने या पक्षातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. रविवारी मोदी यांची भेट घेतल्यापासून मांझी ज्या अविर्भावात बोलत आहेत त्यावरून त्याची पटकथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी लिहिली गेल्याचे स्पष्ट होते, असा जदयूचा आरोप आहे. संयुक्त जनता दलाने मांझी यांना बडतर्फ केल्यानंतर काही तासांतच राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल त्रिपाठी यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी समर्थनार्थ १३० आमदारांची यादीही सादर केली. > राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्यासोबत एक तासाची बैठक आटोपून राजभवनातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, जदयूचे वरिष्ठ नेते नितीशकुमार व जदयूचे प्रमुख शरद यादव.> सरकार स्थापनेची संधी नाकारल्यास अथवा चालढकल झाल्यास आम्ही सर्व १३० आमदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमक्ष हजर करू. यासाठी आम्ही राष्ट्रपतींकडे ११ फेब्रुवारीची वेळ मागितली असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. १३० आमदार पाठीशी : संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि भाकपासह सर्व १३० आमदार राजभवनाबाहेर हजर होते. या सर्वांची ओळखपरेड करण्याची तयारी कुमार यांनी दर्शविली. परंतु राज्यपालांनी त्याची गरज नसल्याचे सांगितले. > मांझींचा दावा : जितनराम मांझी ३ वाजता राजभवनावर धडकले. नितीशकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड असंवैधानिक आहे. सभागृहात आपण बहुमत सिद्ध करू, असा दावा मांझींनी केला.