शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून शॉक लागला; आई-बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:31 IST

वडिलांनी शेजारी पडलेल्या बांबूच्या साहाय्याने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला तर आई देखील त्याला पाण्यातून ओढत रस्त्याच्या एका बाजुला नेण्याचा प्रयत्न करत होती.

नवी दिल्ली - बिहारमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुझफ्फरपूरच्या स्टेशन रोडवर शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. यामधून तरुणाचे पालक थोडक्यात वाचले आहेत. हे कुटुंब दिल्लीहून हमसफर एक्स्प्रेसने मुझफ्फरपूरला परतले होते. त्यांना दरभंगा येथे  जायचं होतं. रेल्वे स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर ते बस स्टँडकडे निघाले, मात्र रस्त्यात मधोमध पाणी भरलं होतं. तरुण पाण्यातून बाहेर येत होता. तर आई-वडील बाजूने जात होते. याच दरम्यान तरुणाला शॉक लागला.

वडिलांनी शेजारी पडलेल्या बांबूच्या साहाय्याने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला तर आई देखील त्याला पाण्यातून ओढत रस्त्याच्या एका बाजुला नेण्याचा प्रयत्न करत होती. कसंबसं आईने आपल्या मुलाला पाण्यातून बाहेर काढलं. यावेळी शेजारी उभे असलेले लोक फक्त पाहत राहिले. त्यांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. तरुणाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्टेशनसह अनेक भागात बांधकाम सुरू आहे. सोमवारी सकाळी झालेल्या पावसामुळे स्टेशन रोडवर पाणी साचलं होतं. महापालिकेच्या स्ट्रीट लाईटची तार तुटून पडली होती. त्यातून करंट जात होता. त्याचाच शॉक तरुणाला लागला आणि त्याने आईवडिलांच्या डोळ्यादेखत जीव गमावला आहे. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Biharबिहार