शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संतापजनक! नराधमांनी भर रस्त्यात फाडले मुलीचे कपडे; बिहारमधील व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:48 IST

मुलीचे कपडे उतरवल्यानंतर या आरोपींनी तिला रस्त्यावर सोडून दिले. 28 एप्रिलला हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला.

पाटणा: कथुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांचे ओरखडे समाजमनावर ताजे असतानाच आता बिहारमध्ये भरदिवसा एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या जेहनाबाद येथे शनिवारी ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार नराधमांनी एका तरूणीला घेरलेले दिसत आहे. हे नराधम तरूणीच्या अंगावरील कपडे फाडत असून निर्लज्जपणे या प्रकाराचे शुटिंग करत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. कथुआ आणि उन्नाव येथील घटनानंतर अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करण्यासाठी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. मात्र, बिहारमधील घटना पाहता या विकृत नराधमांना फाशीच्या शिक्षेमुळे खरंच जरब बसेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या आधारावर पोलिसांनी सोमवारी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन जणांचे चेहरे व्हिडीओतील तरूणांशी मिळतेजुळते आहेत तर अन्य दोन जण या घटनेचे शुटिंग करत होते. या चौघांकडून अन्य काही जणांची नावे कळाली आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी अन्य आरोपींना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतल्याची माहिती पाटण्याच्या विभागीय पोलीस महानिरीक्षकांकडून देण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पाच तरूण एका मुलीसोबत बळजबरी करताना दिसत आहेत. ही मुलगी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. हे सर्वजण मुलीच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून वाचण्यासाठी मुलगी गयावया करताना दिसत आहे. या प्रयत्नात ती जमिनीवर जोरात आपटली. मात्र, थोड्यावेळानंतर भानावर येऊन ही मुलगी पुन्हा सुटण्याची धडपड करताना व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. मुलीचे कपडे उतरवल्यानंतर या आरोपींनी तिला रस्त्यावर सोडून दिले. 28 एप्रिलला हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर अवघ्या 48 तासांत विशेष तपास पथक स्थापन करून चार जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळी असलेल्या एका मोटारसायकलच्या क्रमांकावरून आरोपींचा माग काढण्यात यश मिळाल्याचे समजते. 

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळRapeबलात्कारBiharबिहार