शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्येही काँग्रेसमध्ये संकट : १८ आमदार निघाले होते नितीश यांच्यामागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 02:47 IST

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटविण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटविण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला दहा कलमी मागण्यांचे पत्रही दिले आहे. वीरभद्र सिंह यांच्या आग्रही भूमिकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकांआधीच काँग्रेसपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे बिहारमधील काँग्रेसमध्येही पेचप्रसंग निर्माणझाला आहे. अर्थात तो दूर करण्यात काँग्रेस श्रेष्ठींना तूर्त तरी यश आले आहे.गेल्या दोन दिवसांपासून वीरभद्र सिंह दिल्लीत आहेत. त्यांनी बुधवारी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. हिमाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटवून त्यांच्या जागी आशा कुमारी यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच निवडणुकीत मुक्त हस्त द्यावा, अशा मागण्यांसह त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीसह विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका पत्रात मांडली आहेत.काँग्रेसने मात्र याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. वीरभद्र सिंह यांच्या या पत्राबाबत कल्पना नसल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. सुखविंदर सिंह सुखू यांची नियुक्ती राहुल गांधी गटाने केली असल्याने प्रदेशाध्यक्ष सुखविंदर यांना हटविण्याच्या निर्णयाला त्यांची मंजुरी घ्यावी लागेल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, बिहारमधील काँग्रेसमधील राजकीय संकट दूर करण्यात पक्षाच्या श्रेष्ठींना तात्पुरतेच यश आले आहे. बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी व बिहार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंह यांनी पक्ष सोडून नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याची भाषा सुरू केली असल्याचे पत्र तीन आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविले होते.दोन्ही नेत्यांनी नितीश कुमार यांना पाठिंबा देण्यासाठी हे पत्र तयार केले असून, त्यावर ते आमदारांच्या सह्या घेत आहेत आणि आतापर्यंत १४ आमदारांच्या सह्याही घेतल्या आहेत. आता दोनतृ्तीयांश आमदारांच्या सह्या झाल्या असून, आणखी चार आमदारांच्या सह्या होणे बाकी आहे, अशी माहितीही तीन आमदारांनी सोनिया गांधी यांना दिली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनी चौधरी व सिंह यांना लगेच दिल्लीत बोलावून समज दिली. त्या वेळी अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, पी. सी. जोशी हेही उपस्थित होते.२७ आमदारांच्या पाठिंब्याचा दावामुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी आपणास २७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाकेला आहे. तसेच विधानसभेची आगामी निवडणूक न लढविण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस नेतृत्वाने दखल देऊन मार्ग काढावा, असे त्यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे आहे. अन्यथा आम्हीही निवडणूक लढविणार नाही, असे म्हटले आहे.किती काळ शांतता? : त्यानंतर अशोक चौधरी व सदानंद सिंह यांनी आम्ही पक्ष सोडणार नाही आणि सर्व आमदारांनाही तसे समजावू, असे आश्वासन सोनिया गांधी यांना दिल्याचे समजते. त्यामुळे बिहार काँग्रेसमधील संकट तूर्त थांबले आहे, असे दिसते. मात्र अशी स्थिती किती काळ राहील, हे सांगणे अवघड आहे.