शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतूट प्रेम! पत्नीच्या मृत्यूनंतर काही क्षणात पतीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:30 IST

अवघ्या काही तासांतच दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली.

बिहारमधील रोहतास जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या पतीचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. करगहर परिसरातील इटिम्हां गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. 

60 वर्षीय तेतरी देवी दीर्घकाळापासून आजारी होत्या. बुधवारी त्यांचं निधन झाले. याची माहिती मिळताच त्यांचे पती गंगा सिंह (65 वर्षे) यांचाही मृत्यू झाला. अवघ्या काही तासांतच दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. यासोबतच एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

या दाम्पत्याची मुलगी केबी सिंह सांगते की, तिची आई काही दिवसांपासून आजारी होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान, बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच वडिलांची प्रकृतीही बिघडली. आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. यानंतर वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. पण त्याचाही मृत्यू झाला.

अखेर दोघांची एकत्रत अंत्ययात्रा निघाली. यासोबतच स्मशानभूमीत पती-पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकांचे म्हणणे आहे की या जोडप्याची तब्येतही एकत्र बिघडली होती. एकाच दिवशी आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.