शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

'हा' प्लंबर काम करणारा तरुण रातोरात बनला कोट्यधीश, फँटसी गेम मध्ये जिंकले तब्बल 1 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 16:32 IST

एक कोटीची रक्कम मिळाल्यानंतर बबलू मंडलच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर, लोक त्याच्या घरी पोहोचून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत.

कटिहार - बिहारमधील (Bihar) कटिहार जिल्ह्यातील मनिहारीच्या केवला पंचायतीमधील हंसवार या छोट्याशा गावातील रहिवासी बबलू मंडलला Dream11 ने एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. एक कोटीची रक्कम मिळाल्यानंतर बबलू मंडलच्या (Bablu Mandal) घरात उत्सवाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर, लोक त्याच्या घरी पोहोचून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत.

यासंदर्भात बोलताना रातोरात कोट्यधीश झालेल्या बबलूने सांगितले की, त्याच्या पत्नीचा भाऊ, छोटू (मेहुणा), हा त्याला प्लंबर मिस्त्री कामात मदत करत होता. त्याने बबलूला ड्रीम 11 अॅप डाउनलोड करून दिले आणि खेळायला शिकवले. यानंतर बबलूने सुरुवातीला 49 रुपये गुंतवले, यातून त्याला 200 रुपये मिळाले. पण, यानंतर तो हळूहळू हरू लागला. मात्र, रविवारी आयपीएलमध्ये, डीसी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेला सामना खेळणाऱ्या दोन्ही संघातील 11 खेळाडूं निवडून त्याने गेममध्ये 59 रुपये लावले होते. 

यानंतर त्याला सकाळी मेसेज आला, की तो पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याने एक कोटी रुपये जिंकले आहेत. आता एक कोटी रुपयांवर तीस लख रुपयांचा जीएसटी कापून त्याच्या खात्यात सत्तर लाख रुपये पाठविण्यात आले आहेत.

पक्क घर बांधणार -यानंतर, बबलू म्हणाला, त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तो त्याचे तुटलेले घर आता पक्के करेल. यानंतर, जे पैसे उरतील ते मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी खर्च केले जातील. याच बरोबर निराधार लोकांना मदत आणि पूजा पाठही केला जाईल. यापूर्वीही एका व्यक्तीने असेच एक कोटी रुपये  जिंकले आहेत.

टॅग्स :BiharबिहारCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीIPLआयपीएल २०२१