शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी दिल्लीला रवाना; पत्नी राबडी देवी, तेजस्वीही सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 21:54 IST

जेडीयू प्रवक्ता आणि माजी मंत्री नीरज कुमार (Neeraj Kumar) यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत लालू कुटुंबावर निशाना साधला आहे. त्यांनी कवितेच्या स्वरुपात हे ट्विट केले आहेत.

पाटणा -बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची (Lalu Prasad Yadav) प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावल्याने पाटणा येथे आलेले आरजेडी (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव बुधवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी राबडी देवी, (Rabri Devi), मोठी मुलगी मीसा भारती (Misa Bharti) आणि छोटा मुलगा तेजस्वीही (Tejashwi Yadav) आहेत. निवडणूक निकाल आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, हे सर्व जण दिल्लीला रवाना झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधणे सुरू केले आहे.

पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर आपली प्रकृती ठीक नसून आपण उपचारासाठी दिल्लीला जात आहोत, असे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. बिहारमध्ये नुकतीच दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यासाठी लालू प्रसाद हे पाटण्याला आले होते. यावेळी त्यांनी 27 ऑक्टोबरला कुशेश्वरस्थान येथे निवडणूक रॅलीलाही संबोधित केले.

लालू प्रसाद यादव यांना विमानतळावर आधार देऊन गाडीतून खाली उतरविण्यात आले. चारा घोटाळ्यातील दोशी लालू प्रसाद हे पाटण्यात आले होते. यापूर्वी लालू दिल्लीतच त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या घरी राहत होते.

जेडीयूचा टोला - जेडीयू प्रवक्ता आणि माजी मंत्री नीरज कुमार (Neeraj Kumar) यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत लालू कुटुंबावर निशाना साधला आहे. कवितेच्या स्वरुपात करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये कुमार यांनी म्हटले आहे..."राजनैतिक शहजादे को बिहारियों का ख्याल कहाँ आताचुनाव आते ही सपरिवार बिहार आताचुनाव में भ्रामक मुद्दे उछाल जाताचुनाव परिणाम खिलाफ में आऐ तो फरार हो जाताआर्थिक अपराधियों की दीपावली दिल्ली व पटियाला कोर्ट में मनाया जाता"

असा साधला निशाणा -निरज कुमार यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे... - "जो कहते थे कर देंगे खेला, विमान पर सवार हो लौट रहे देख कर मेला... मछली की जान लेकर भी जो जीत ना पाए, बड़े मायूस होकर प्रवासी कहलाये... कहाँ तो महीने का था प्रोग्राम, वोट भी ना मिल पाया कुछ ग्राम... क्या मुँह दिखलाते क्या हार का किस्सा बतलाते..."

आणखी एका ट्विटमध्ये, तुम्हाला भगवान श्रीकृणांचा श्राप लागला आहे. मग कोण वाचवणार, असे म्हणत निरज कुणार यांनी लिहिले आहे... - "जा रहे हैं तो जाइये, मगर आते रहिएगा बिहार...कृष्ण का श्राप लग गया आपको, फिर कौन बचाता...कुछ दिन बाद खुद कहियेगा कि पोस्टर में हमरा फोटो क्यों नहीं आता ?" 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारdelhiदिल्ली