शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! 4 राज्यांत 6 बायका; जिथे जायचा तिथे 'हा' करायचा लग्न'; अखेर 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 08:23 IST

पोलिसांनी चौकशी केली असता छोटू नाव असलेल्या या व्यक्तीच्या चार राज्यांत सहा पत्नी आहेत

बिहारच्या जमुईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या भावोजीला एका महिलेसोबत रंगेहात पकडलं आणि कुटुंबीयांना याची माहिती दिली. जेव्हा नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तेव्हा सत्य समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्यक्तीने सहा लग्न केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी चौकशी केली असता छोटू नाव असलेल्या या व्यक्तीच्या चार राज्यांत सहा पत्नी आहेत. 

पहिल्या पत्नीपासून त्याला चार मुलं आहेत. तसेच आणखी एका महिलेपासूनही दोन मुलं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जावातारी गावात ही घटना घडली आहे. छोटूची पत्नी मंजू हिचा भाऊ विकास हा कोलकाता येथे जाण्यासाठी जमुई स्टेशनवर आला होता. तेव्हा त्याला छोटू दिसला. त्या आपल्या बहिणीचा नवरा अन्य एका महिलेसह ट्रेनची वाट पाहत असल्यातं समजलं. त्याने लगेचच कुटुंबीयांना याची माहिती दिली. 

कुटुंबीयांनी छोटू आणि त्याच्यासह असलेल्या महिलेला रंगेहाथ पकडलं. जेव्हा तिच्याबाबत विचारलं तेव्हा त्याने ही आपली पत्नी असल्याचं सांगितलं. हे ऐकताच नातेवाईक हैराण झाले. त्यानंतर छोटूला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मंजूच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये माझ्या मुलीचं याच्याशी लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं देखील आहेत. पण अचानक दीड वर्षांपूर्वी हा औषध आणायला सायकल घेऊन गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर आज त्याला विकासने पकडलं आहे. 

छोटू हा देवघरच्या मां शारदा आर्केस्ट्रामध्ये काम करतो. या चार राज्यात त्याच्या सहा पत्नी आहेत. छोटूने चिनवेरिया, सुंदरटांड, रांची, संग्रामपूर, दिल्ली आणि देवघर येथे राहणाऱ्या महिलांशी लग्न केलं आहे आणि या सर्वांना मुलं देखील आहेत. जिथे आर्केस्ट्रा असेल तिथे तो जायचा आणि लग्न करायचा. आतापर्यंत त्याने सहा महिलांना धोका दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Biharबिहार