शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये खासदाराच्या वाहनाने पाच जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:23 IST

बिहारमधील काँग्रेसच्या खासदार श्रीमती रणजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने सोमवारी रस्त्यावरून जाणा-या पाच जणांना चिरडले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.

पाटणा : बिहारमधील काँग्रेसच्या खासदार श्रीमती रणजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने सोमवारी रस्त्यावरून जाणा-या पाच जणांना चिरडले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. बिहारच्या सुपोलमधील निर्मली-सिकरहाटा मार्गावर हा अपघात झाला. त्या वेळी निर्मली शहर काँग्रेसचे अध्यक्ष रामप्रकाश यादवही खा. रंजन यांच्यासोबत होते. खा. रणजीत रंजन या काँग्रेसच्या खासदार असल्या तरी त्यांचे पती पप्पू यादव हे जन अधिकारी पक्षाचे नेते आहेत. पप्पू यादव यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यांचा राष्ट्रीय जनता दलाशी संबंध होता आणि काही काळ ते भाजपाशीही संबंधित होते.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून खासदार रंजन आपल्या हार्ले डेव्हिडसन बाइकवरून संसदेत गेल्या होत्या. संसद भवनाच्या मुख्य दाराशी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले होते. निळ्या रंगाचा सुट, डोक्यावर हेल्मेट आणि डोळ्यावर गॉगल अशा वेशात त्या बाइकवरून गेल्यामुळे त्यांना रक्षकांनी ओळखलेच नव्हते. संसदेत बाइक नेण्यास परवानगीही नाही. मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संमती दिल्यानंतर त्यांना बाइकसह आत जाण्यास परवानगी देण्यात आली.आपण बाइकच नव्हे, तर अनेकदा सायकलही चालवतो, असे खा. रंजन अभिमानाने सांगतात. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर कधीच कोणतीही बंधने आणली नाहीत, असाही त्या उल्लेख करतात.