शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आजोबा पेन्शन आणायला गेले; ५२ कोटींचा बँक बॅलन्स पाहून चक्रावले; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 16:04 IST

पेन्शन आणायला बँकेत गेले असताना खात्यातील शिल्लक पाहून वृद्धाला धक्का

मुझफ्फरपूर: बँक खात्यात अचानक भरमसाठ रक्कम येण्याचे प्रकार बिहारमध्ये घडत आहेत. खगडिया, कटिहारनंतर आता मुझफ्फरपूरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. एका वृद्धाच्या खात्यात अचानक ५२ कोटी रुपये जमा झाले आहेत. निवृत्ती वेतन आणण्यासाठी वृद्ध बँकेच्या शाखेत गेला असताना त्याला याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्का बसला. 

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे रामबहादूर शाह त्यांचं निवृत्ती वेतन आणण्यासाठी बँकेत गेले होते. बँक खात्यातील रक्कम तपासण्यासाठी शाह यांना तिथल्या एका कर्मचाऱ्यानं अंगठा लावण्यास सांगितलं. शाह यांनी अंगठा लावताच बँक कर्मचाऱ्याला धक्काच बसला. कारण शाह यांच्या खात्यात ५२ कोटींहून अधिक रक्कम होती. ही बातमी बघता बघता वणव्याप्रमाणे पंचक्रोशीत पसरली.स्पीड किती आहे रे? नितीन गडकरी सुस्साट वेगानं मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेची चाचणी करतात तेव्हा...

घटनेची माहिती समजताच स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी शाह यांना गाठलं. निवृत्ती वेतन खात्यात जमा झालंय का ते तपासण्यासाठी बँकेत गेलो असताना ही बाब समजल्याचं शाह यांनी सांगितलं. 'आम्ही शेती करून उदरनिर्वाह करतो. माझ्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्कम आम्हाला देण्यात यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. त्यामुळे आमचा वृद्धापकाळ चांगला जाईल,' अशी इच्छा शाह यांनी व्यक्त केली. 

माझ्या वडिलांच्या खात्यात ५२ कोटी रुपये असल्याचं एकाएकी आम्हाला समजलं. यामुळे आम्ही त्रस्त आहोत. आम्ही गरीब आहोत. सरकारनं आम्हाला काहीतरी मदत द्यावी, असं शाह यांचा मुलगा सुजीतनं म्हटलं. शाह यांच्या खात्यात ५२ कोटी असल्याची माहिती स्थानिकांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. या प्रकरणी तपास सुरू असून वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असं कटरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज पांडे यांनी सांगितलं.