शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
6
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
7
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
8
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
9
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
10
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
11
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
12
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
13
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
14
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
15
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
16
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
17
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
18
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
19
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
20
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 08:31 IST

मधेपुरात राजकीय वातावरण तापले, विद्यमान आमदार प्रा. चंद्रशेखर यांनाच दिले पुन्हा तिकीट  

एस. पी. सिन्हा 

पाटणा : ‘राजद’चे नेते आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दिवंगत शरद यादव यांचे चिरंजीव शांतनू यादव यांना पक्षाचे तिकीट दिले खरे मात्र, रात्री उशिरा त्यांचे तिकीट काढून घेत ते प्रा. चंद्रशेखर यांना देण्यात आले. यानिमित्ताने मधेपुरातील राजकीय वातावरण तापले आहे. तिकीट परत घेतल्यानंतर शरद यादव यांचे पुत्र शांतनू यादव यांनी त्यांच्याविरुद्ध राजकीय कट रचला गेल्याचा आरोप केला आहे. 

शांतनू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये त्यांचे वडील शरद यादव एका बाजूला आहेत व ते स्वतः दुसऱ्या बाजूला आहेत. मध्यभागी तेजस्वी यादव दिसत आहेत. तेजस्वी यांनी शांतनू यांचा हात वर उचललेला दिसत आहे. शांतनू यांनी म्हटले आहे की, माझ्याविरुद्ध राजकीय कट रचण्यात आला आहे. समाजवाद हरला आहे. 

बी. पी. मंडल, शरद यादव आणि लालू प्रसाद यादव यांसारख्या नेत्यांनी येथील राजकारणाला एक नवीन दिशा दिली. या भागात समाजवादी चळवळ रुजली. येथील प्रत्येक निवडणूक विचारसरणीपेक्षा व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षाचे व्यासपीठ बनली आहे. 

... यांना देण्यात आला नकार काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सदस्य मदन मोहन झा यांच्या मुलालाही तिकीट नाकारण्यात आले. चारवेळा आमदार राहिलेले आणि ज्येष्ठ नेते अजित शर्मा हे चित्रपट अभिनेत्री मुलगी नेहा शर्मा हिच्यासाठी तिकीट मागत होते. मात्र, पक्षाने मुलीऐवजी वडील अजित शर्मा यांनाच तिकीट दिले. माजी आमदार अवधेश कुमार सिंह यांनी वजीरगंज मतदारसंघातून त्यांचा मुलगा शशी शेखर सिंह यांना तिकीट मागितले होते. शशी शेखर २०२० च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. म्हणून पक्षाने त्यांच्या मुलाऐवजी त्यांचे वडील अवधेश सिंह यांना उमेदवारी दिली आहे. 

‘राजद’चे डॅमेज कंट्रोलजाणकारांचे असे मत आहे की, शरद यादव यांचे पुत्र शांतनु यादव यांना तिकीट नाकारणे हे, ‘राजद’ने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ‘राजद’ने शरद यादव यांचे पुत्र शांतनू यादव यांना मधेपुरातून तिकीट दिले; पण यामुळे विद्यमान आमदार डॉ. चंद्रशेखर यादव यांचे तिकीट कापल्याच्या वृत्ताने राजदच्या गोटात खळबळ उडाली. त्यानंतर शांतनू यांचे तिकीट मागे घेत ते पुन्हा डॉ. चंद्रशेखर यांना देण्यात आले. 

काँग्रेसने दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख समाप्त होण्याची वेळ जवळ येत असताना पक्षाने तरुण पिढीला प्राधान्य देण्याऐवजी अनुभवी आणि दिग्गज उमेदवारांवर विश्वास ठेवला आहे. 

माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या कन्या व लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार या त्यांच्या मुलासाठी अंशुल अभिजितसाठी तिकीट मागत होत्या. परंतु, पक्षाने त्यांना नकार दिला. माजी केंद्रीय मंत्री शकील अहमददेखील त्यांच्या मुलासाठी तिकीट मागत होते. त्यांनाही नकार मिळाला. 

तारिक अन्वर यांची नाराजी खासदार तारिक अन्वर यांनी तिकीट वाटपावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रश्न केला की ३०,००० पेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी का देण्यात आली. तर केवळ ११३ मतांनी पराभूत झालेल्या माजी आमदार गजानंद शाही यांना तिकीट नाकारण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : RJD denies ticket to Sharad Yadav's son, Congress rejects dynasts.

Web Summary : RJD withdrew Sharad Yadav's son's ticket amid political turmoil. Congress also denied tickets to sons of veteran leaders, prioritizing experience over lineage in Bihar elections.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024congressकाँग्रेस