शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:45 IST

आपण प्रचारासाठी पैसा कुठून आणतात, असा प्रश्न आपल्याला नेहमीच विचारला जातो? तर आपण...!

जन सूरज पक्षाचे संयोजक तथा माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वतःसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. किशोर म्हणाले, जेव्हा आपण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत होतो, तेव्हा केवळ एका निवडणुकीत कुठल्याही पक्षाकडून अथवा नेत्याकडून सल्ला देण्यासाठी 100 कोटी अथवा त्याहूनही अधिक शुल्क घेत होतो. यावेळी, आपण स्थापन केलेले सरकार दहा राज्यांत सुरू असल्याचेही ते म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी बिहारच्या बेलागंज येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुरुवारी हा खुलासा केला. बिहारमधील बेलागंज, इमामगंज, रामगड आणि तरारी या चार विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. यात प्रशांत किशोर यांच जन सुराज पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. किशोर यांनी या चारही जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. 

केवळ सल्ला देण्यासाठी घेतो ₹100 कोटी - प्रशांत किशोर हे गुरुवारी बेलागंजमध्ये जन सूरजचे उमेदवार मोहम्मद अमजद यांच्या समर्थनार्थ प्रचार करत होते. यावेळी,  आपण प्रचारासाठी पैसा कुठून आणतात, असा प्रश्न आपल्याला नेहमीच विचारला जातो? तर आपण निवडणुकीमध्ये पक्षाच्या कोणत्याही नेत्याला सल्ला देण्यासाठी ₹100 कोटींहून अधिक शुल्क आकारतो, असे त्यांनी म्हटले आहे.

"10 राज्यातं सुरू आहे आपण बनवलेलं सरकार" -एका प्रचारसभेदरम्यान प्रशांत किशोर म्हणाले, "10 राज्यांत आपण बनवलेले सरकार सुरू असेल, तर आम्हाला आमच्या प्रचारासाठी टेंट आणि तंबू उभारायला पैसे मिळणार नाहीत का? तुम्ही आम्हाला इतके कमकुवत समजत आहात का? बिहारमध्ये कुणी ऐकले नसेल, एका निवडणुकीत एखाद्या पक्षाला अथवा उमेदवाराला सल्ला देण्यासाठी आमचे शुल्क ₹100 कोटी अथवा त्याहूनही अधिक आहे.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, "आम्ही 2 वर्षांपर्यंत आपल्या अभियानासाठी टेंट आणि तंबू लावत राहू आणि यानंतर, केवळ एका निवडणुकीत एखाद्याला सल्ला दिला तर सर्वच्या सर्व पैसा एकाच दिवसात येऊन जाईल."

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारElectionनिवडणूक 2024Politicsराजकारण