शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

बिहारमध्ये एनआरसीची गरज नाही; विधानसभेत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 07:03 IST

एनपीआर २०१० नुसार करणार

पाटणा : बिहारमध्येएनआरसीची गरज नाही आणि २०१० च्या प्रारूपानुसार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत केली जाईल, असा ठराव बिहार विधानसभेत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आला. एनआरसीविरोधी ठराव मंजूर करणारे बिहार हे पहिले भाजपप्रणीत एनडीएशासित राज्य आहे.विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतरांच्या स्थगन प्रस्तावरील चर्चेनंतर विधानसभेत यासंदर्भात सर्वपक्षीय ठराव मांडणयात आला. भोजनाच्या सुटीनंतर विधानसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनपीआरमध्ये अतिरिक्त रकान्यांचा समावेश करण्यास विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. केंद्र सरकारने एनपीआरमध्ये अतिरिक्त रकान्यांचा समावेश करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. केंद्र सरकारला लिहिलेले पत्र वाचून दाखविताना ते म्हणाले की, एनपीआरच्या रकान्यात लिंगपरिवर्तितांचा समावेश करण्यात यावा, असा बिहार सरकारने प्रस्ताव दिला आहे. २०१० च्या प्रारूपानुसारच एनपीआरसाठी माहिती घेण्यात यावी, अशी विनंती केंद्राला करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेने मंजूर केलेला असून सध्या या कायद्याशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा कायदा वैध आहे की नाही, हे सर्वोच्च न्यायालय निश्चित करील.तत्पूर्वी, सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) सत्ताधारी आणि विरोधी पक्षात खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी हा काळा कायदा असल्याचे म्हटले होते. त्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.काय म्हणाले, मुख्यमंत्री नितीशकुमार?बिहारमध्ये एनपीआर कशी करणार, याबाबत संभ्रम नसावा. कोणालाही आई-वडिलांची जन्मतारीख किंवा त्यांच्या जन्माचे ठिकाण याबाबत माहिती देण्यास सांगितले जाणार नाही. २०२० च्या प्रारूपानुसार एनपीआर केल्यास काही घटकांसाठी धोकादायक आहे. काही विशेष माहिती घेतल्यास आणि भविष्यात एनआरसी झाल्यास ते अडचणीत येतील, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :National Register of CitizensएनआरसीBiharबिहार