शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारण

By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 18:23 IST

Bihar Assembly Election Result News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दरम्यान, या अटीतटीच्या लढतीमध्ये एनडीएने आघाडी घेतली आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणावं तेवढं लक्ष दिलं नाही. नवीन नेतृत्व असल्याने त्याला वाव मिळावा म्हणून आम्ही बिहारमध्या जागांबाबत आग्रह धरला नाही, असे पवार यांनी सांगितले.ते म्हणाले की, बिहारमध्ये आम्हाला अपेक्षित असा निकाल आला नाही. त्याची काही कारणं आहेत. एकीकडे तेजस्वी यादव यांनी एकहाती मोर्चा सांभाळला होता. तर दुसरीकडे एनडीएकडे सर्व व्यवस्था होती. मोदींनी आक्रमक प्रचार केला. एकंदरीत तेजस्वी यादव यांनी अनुभवाच्या मनाने चांगली लढत दिली. आता त्यांना यश मिळालं नसलं तरी आणि परिवर्तन झालं नसंल तरी हळुहळू बदल होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये आतापर्यंत एनडीए १२३ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ११२ जागांवर आघा़डीवर आहे. तर इतर उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत स्वबळावर उतरलेले चिराग पासवान यांच्या हाती मात्र निराशा लागली असून, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण