शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:08 IST

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच राज्यातील एनडीए आणि महाआघाडी या प्रस्थापित आघाड्यांऐवजी तिसरा पर्याय उपलब्ध करून देणारे जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे अडचणीत सापडले आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच राज्यातील एनडीए आणि महाआघाडी या प्रस्थापित आघाड्यांऐवजी तिसरा पर्याय उपलब्ध करून देणारे जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाकडील नोंदींनुसार प्रशांत किशोर यांचं नाव पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन राज्यातील मतदार यादीत नोंदवलेलं असल्याचं समोर आलं आहे.

प्रशांत किशोर यांचं नाव कोलकाता येथील १२१, कालीघाट रोड या पत्त्यावर नोंदवण्यात आलेलं आहे. या ठिकाणीच तृणमूल काँग्रेसचं मुख्य कार्यालय आहे. तसेच हा परिसर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्प्रेसमध्ये प्रकाशित झाले आहे.

प्रशांत किशोर यांनी २०२१ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रणनीतिकार म्हणून काम केलं होतं. दरम्यान, प्रशांत किशोर यांचं मतदान केंद्र सेंट हेलेन स्कूल, बी. रानीशंकारी लेन येथे नोंदवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोंअर गावातील मतदार यादीमध्येही प्रशांत किशोर यांच्या नावाची नोंद आहे. हा प्रशांत किशोर यांचा मूळ गाव आहे. हा गावा सासाराम लोकसभा मतदारसंघातील करगहर विधानसभा मतदारसंघात येतो. इथे केंद्र माध्यमिक विद्यालय, कोंअर येथे प्रशांत किशोर यांचं मतदान असल्याची नोंद आहे.

लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १७ नुसार कुठल्याही व्यक्तीचं नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये नोंदवता येत नाही. कलम १८ मध्ये असलेल्या नोंदीनुसार कुठलीही व्यक्ती ही एकाच मतदारसंघात मतदार म्हणून दोन वेळा आपलं नाव नोंदवू शकत नाही. जर मतदाराने आपला पत्ता बदलला तर त्याला फॉर्म ८ भरून जुन्या पत्त्यावरून आपलं नाव हटवावं लागतं.

या प्रकरणी प्रशांत किशोर यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर जनसुराज्य पक्षाच्या एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले की, बंगालमधील निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये मतदार कार्ड तयार केलं होतं. तसेच  बंगालमधील कार्ड रद्द करण्यासाटी अर्जही दिला होता. मात्र त्यांचं बंगालच्या यादीतील नाव रद्द झालं की नाही, हे त्यांनी सांगितलं नाही.  

English
हिंदी सारांश
Web Title : Prashant Kishor in Trouble Before Bihar Vote; Electoral Roll Controversy

Web Summary : Prashant Kishor faces trouble before Bihar elections. His name appears in both West Bengal and Bihar voter lists, violating election laws. Kishor's party claims he applied to cancel the Bengal registration after the state elections, but confirmation is awaited.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग