शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:04 IST

Bihar Assembly Election 2025: आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Bihar Assembly Election 2025: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर असून, त्यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात खासदार, आमदार आणि पक्षाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पाटणा येथील बिहार भाजप कार्यालयात सुमारे 70 मिनिटे चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नेत्यांशी संवाद साधला आणि आगामी निवडणुकीसाठी विजयाचा मंत्र दिला.

आगामी निवडणुकीत एका बाजुला काँग्रेस-आरजेडी+ आघाडी आहे, तर दुसऱ्या बाजुला भाजप-जेडीयू+ आहे. अशा परिस्थितीत कोणाला कुठून तिकीट द्यायचे, हे पक्षासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत पीएम मोदींनी घराणेशाही व्यवस्थेचा उल्लेख केला. तसेच, पक्षातील नेत्यांना तिकीट मिळवण्यासाठी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. 

आपल्या पूर्वजांचे बलिदान लक्षात ठेवापंतप्रधान मोदींनी गुरुवारी भाजप कार्यालयात पक्ष नेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुका आणि संघटनेबाबत भाजप नेत्यांना अनेक सल्ले दिले. पंतप्रधान म्हणाले की, आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. हे चार पिढ्यांनंतर घडले आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या पूर्वजांचे बलिदान लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज येथे आहोत.

राजकारणात घराणेशाही नसावीमोदी पुढे म्हणतात, पक्षातील सर्वात मोठे भांडवल म्हणजे संयम. जर तुम्ही धीर धरला तर तुम्हाला आदर मिळेल. निवडणुका आल्या की, काहीजण दुसऱ्या पक्षात जातात आणि नंतर परत  पक्षात येतात, यामुळे तुमचे महत्त्व कमी होते. राजकारणात घराणेशाही नसावी. जमीनदारी नसावी. तुम्ही नाही, तर तुमचा मुलगा, ही व्यवस्था असू नये. एखादा साधा कार्यकर्ता कठोर परिश्रम का करतो, त्याला त्याच्या कष्टाचे फळ का मिळू नये?

...तर आमदारकीचे तिकीट मिळेलपंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना बूथ मजबूत करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी आपल्या नेत्यांसमोर एक अटही ठेवली. ते म्हणाले की, सोशल मीडियावर सक्रिय असले पाहिजे. ज्याला निवडणूक लढवायची आहे, त्याचे सोशल मीडियावर किमान 50 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असावेत. खालच्या पातळीवरील लोकांना सरकारच्या सकारात्मक कामाबद्दल सांगा आणि त्यांना जागरूक करा, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा