शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

केजरीवालांबाबत करणार सर्वात मोठा खुलासा, कपिल मिश्राचा दावा

By admin | Updated: May 18, 2017 23:11 IST

अरविंद केजरीवालांविरोधात शुक्रवारी (दि.18)आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करणार असल्याचा नवीन दावा कपिल मिश्रांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर खळबळजनक आरोपांची मालिका सुरू केली आहे. अरविंद केजरीवालांविरोधात शुक्रवारी (दि.18) आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करणार असल्याचा नवीन दावा कपिल मिश्रांनी केला आहे.  
 
कपिल मिश्रा यांनी ट्विटरद्वारे शुक्रवारी सकाळी 11 वाजता अरविंद केजरीवालांविरोधात सर्वात मोठा खुलासा करणार असल्याचा दावा केला आहे.  उद्याच्या खुलाशामुळे अरविंद केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर्स यांच्यातील नेटवर्क जाहीर होतील असं त्यांनी ट्विट केलं आहे. यामागे मिश्रांनी केजरीवालांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओचा उल्लेख केला आहे.  
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ एका खासगी चॅनलचा होता. या व्हिडीओत मुकेश शर्मा नावाच्या एका व्यक्तीने आम आदमी पक्षाला दोन कोटी रूपये देणगी दिल्याचा दावा केला होता. 
 
आज केजरीवालांनी व्हिडीओ व्हायरल केला, उद्या सकाळी केजरीवालांच्या या खोटारडेपणाचा पर्दाफाश करेल. कायदा माहित आहे, उद्या उत्तर देईल असं ट्विट त्यांनी केलं.

काय आहे आरोप-

दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले असा सनसनाटी आरोप करून कपिल मिश्रांनी दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. जैन हे केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. दुसरीकडे आपने त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सिसोदिया म्हणाले, कपिल मिश्रांनी केलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे असून हे सर्व आरोप निराधार आहे. प्रतिक्रिया देण्यासारखे हे आरोप नाही असे सिसोदिया यांनी म्हटले. त्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असून कोणत्याही आधाराशिवाय हे आरोप करण्यात आल्याचं ते म्हणाले. मात्र, मिश्रा यांच्या या आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले. ‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसेच मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्यानं मला हटवण्यात आलं असं ते म्हणाले. याशिवाय केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं "डील" केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या गंभीर आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.