शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

केरळच्या पर्यटन व्यवसायाला महापुराने बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:47 IST

टूर अनिश्चित काळासाठी स्थगित; लाखो पर्यटकांचा हिरमोड

- चिन्मय काळे मुंबई : केरळमधील महापुरामुळे सर्व पर्यटन कंपन्यांनी तेथील टूर अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील साडेतीन लाखाहून अधिक पर्यटकांना त्यांंची केरळ टूर रद्द करावी लागली आहे. कंपन्या त्यांना आता अन्य पर्यटनस्थळांचा पर्याय देत आहेत.केरळमधील पर्यटनाचा हंगाम जुलैनंतर सुरु होतो. जून-जुलैमधील दमदार पावसानंतर वातावरण आल्हाददायी बनल्याने आॅगस्टपासून तिथे पर्यटकांची लगबग वाढू लागते. यंदा मात्र आॅगस्ट महिन्यातच पावसाने रुद्रावतार दाखवला. महापुरामुळे अनेक पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे कंपन्यांना तेथील टूर रद्द कराव्या लागल्या आहेत.थॉमस कूक इंडिया लिमिटेडचे भारत प्रमुख राजीव काळे म्हणाले की, सध्या केरळमधील स्थिती भीषण आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तेथील सर्व टूर आम्ही रद्द केल्या आहेत. या पुन्हा कधी निघतील, हे सांगता येणार नाही. तुर्तास आम्ही पर्यटकांना केरळात न जाण्याचा सल्ला देत आहोत. ज्यांचे बुकिंग झाले आहे त्यांना उटी, कोडाईकनाल, कूर्ग, म्हैसूर, बंगळुरू आदी पर्याय देत आहोत. प्रसंगी त्यांना पैसेही परत करीत आहोत.केरळमध्ये आॅगस्ट महिन्यात देशभरातून जवळपास १२ लाख पर्यटक येतात. यातील ७५ ते ८० हजार पर्यटक विदेशातील असतात. विदेशीतून येणारे अर्धे पर्यटक मुंबईतून केरळकडे जातात. देश-विदेशातील आणि महाराष्टÑातून जाणाऱ्या ३.५० ते ३.८० लाख पर्यटकांना आता केरळ टूर रद्द करावी लागला आहे.‘या महापुरामुळे १४ ते १६ पर्यटनस्थळांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने निलगिरी डोंगरांमधील ठिकाणांना फटका बसला आहे. पर्यटकांसह एकूण १० लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. महापुरात मुख्यत्वे विविध ठिकाणी जाणारे रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी दुभंगले आहेत. येत्या १५ दिवसात पर्यटन पूर्ववत सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पूवार, अ‍ॅलेप्पी, कोल्लम यासारखे उत्तर किंवा दक्षिण केरळमधील समुद्रकिनारी असलेली पर्यटनस्थळे सुरक्षित आहेत. तिथे पर्यटक आजही येऊ शकतात. केवळ हिल स्टेशन व मध्य केरळला प्रचंड फटका बसला आहे.- पी. बाल किरण, संचालक, केरळ पर्यटन

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरtourismपर्यटन