शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

मोठी बातमी : मिठाईचा टिकाऊपणा नमूद करणे आता बंधनकारक ; १ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:21 IST

मिठाई उत्पादकांमध्ये करणार जागृती 

ठळक मुद्देयेत्या 1 ऑक्टोबरपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे एफएसएसआयएने दिले आदेश

पुणे (पिंपरी) : ग्राहकांना चांगल्या दर्जाची उत्पादने मिळावीत यासाठी मिठाईचा टिकाऊपणा ग्राहकांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या एक ऑक्टोबर पासून मिठाई कोणत्या तारखेपर्यंत खाणे योग्य आहे, याचा कालावधी दर्शविणे आवश्यक असेल. फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड अथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसआयए) नुकतेच त्याबाबतचे आदेश दिले आहेत. जून 2020 पासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. एफएसएसआयएने येत्या 1 ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मिठाई पदार्थाचा ताजेपणाचा कालावधी अर्थात 'बेस्ट बिफोर' तारीख नमूद करावी लागेल. 

ग्राहकांना चांगल्या प्रकारची दुग्धजन्य मिठाई मिळावी यासाठी ताजेपणाची खात्री देणे उत्पादकांवर बंधनकारक करण्यात आले आहे. मिठाई दुकानांमध्ये दर्शनी भागात सुट्टी मिठाई ठेवलेली असते. मागणी प्रमाणे त्यातील मिठाई बॉक्स मध्ये भरून दिली जाते. ही मिठाई कोणत्या तारखे पर्यंत सेवन करणे चांगले राहील याची माहिती  नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. मिठाईच्या प्रकारानुसार पदार्थाच्या ताजेपणाची तारीख वेगळी असू शकते. 

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे म्हणाले, फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड अथोरिटी  ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सहसंचालकाना देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात याचा मिठाई उत्पादकांमध्ये प्रचार करण्यात येईल. त्या नंतरही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक अथवा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल. 

----//

अंमलबजावणी अडचणीची ठरेल : चितळेया निर्णयाची अंमलबजावणी करणे उत्पादकांसाठी अडचणीचे आहे. काही मिठाई दोन दिवस तर काही मिठाई आठ दिवसापर्यंत चांगली राहते. मिठाई ठेवलेल्या ताटा बाहेर बेस्ट बिफोर तारीख नमूद केली जाईल. मात्र, या निर्णयाचा संघटना विरोध करेल. कारण यामुळे नोकरशाही कडून मिठाई उत्पादकांना त्रासाला सामोरे जावे लागेल. बेस्ट बिफोरची अंमलबजावणी करताना त्याचा संघटनात्मक पातळीवर विरोधही केला जाईल. कारण मिठाई वगळता मांस देखील उघड्यावर विकले जाते. त्यांना असे बंधन नसल्याचे मिठाई आणि फरसाण असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfoodअन्नcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय